29 मार्चच्या घटनेत रणदिपसिंघ उर्फ दिपु या यवुकाला अटकपुर्व जामीन फेटाळला;आजपर्यंत तरी सुर्याजी पिसाळाचा विजय झाल्याचे दिसते 

नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्चच्या प्रकरणात एक अटकपुर्व जामीन रद्द झाल्यानंतर या प्रकरणात सुर्याजी पिसाळाचा विजय झाला असे  म्हणण्याशिवाय दुसरा शब्दपर्याय उपलब्ध नाही. आज पहिल्या पायरीवर सरदार रणदिपसिंघ उर्फ दिपुचा पराभव झाला असता तरी याही पुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 
                       दि.29 मार्च 2021 रोजी पोलीसांवर हल्ला झाला याप्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह अनेक कलमांना जोडून गुन्हा क्रमांक 114/2021 दाखल झाला होता. त्या प्रकरणात बरेच लोक जेलमध्ये गेले. जवळपास 130 दिवसानंतर अनेकांना जामीन मिळाली. अद्यापही त्यात फरार आरोपी सदरात बऱ्याच जणांची नावे शिल्लक आहेत. त्या फरार आरोपींमध्ये एक नाव रणदिपसिंघ उर्फ दिपु ईश्र्वरसिंघ सरदार या युवकाचे पण आहे. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी मात्र रणदिपसिंघचे नाव एफआयआरमध्ये नव्हते. पुढे पोलीस ठाणे अर्धापूरच्या हद्दीत एका युवकाचा खून झाला. त्या संबंधाने दाखल झालेल्या 302 च्या गुन्ह्यात एकूण 6 जणांना अटक झाली आणि त्याच दिवशी वजिराबाद पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला रणदिपसिंघ उर्फ दिपु ईश्र्वरसिंघ सरदार  77 दिवसांपुर्वी 29 मार्च रोजी पोलीसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात हातात तलवार घेवून दिसला होता म्हणे. असा एक जबाब गुन्हा क्रमांक 114 च्या तपासात दाखल आहे. आपल्या लहानपणापासून आजपर्यंत कधीच कोणत्या मिरवणुकीत मी सामील झालो नाही असा मुद्या घेवून रणदिपसिंघ सरदारने नांदेड न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 653/2021 दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात 17 ऑगस्ट 2021 रोजी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणी झाल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि रणदिपसिंघ उर्फ दिपु ईश्र्वरसिंघ सरदारचा जामीन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. याप्रकरणात साक्षात्कार झालेल्या पोलीस अंमलदाराविरुध्द रणदिपसिंघ उर्फ दिपु याने सन 2020 मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जाच्या कारणावरुनच माझ्याविरुध्द त्या पोलीस अंमलदाराचा जबाब नोंदवून मला त्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. असा युक्तीवाद दिपु च्या वतीने करण्यात आला होता. तरीपण न्यायालयाने रणदिपसिंघचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आजपर्यंतच्या या लढाईत सूर्याजी पिसाळ यांचा विजय झाला असेच लिहावे लागेल. रणदिपसिंघने सुर्याजी पिसाळाच्या पाठपुराव्यामुळेच मला या गुन्ह्यात अडकविण्यात आले असा अर्ज सुध्दा केला होता. पण त्या प्रकरणात काय कार्यवाही झाली हे समजले नाही. एकूणच आजपर्यंतच्या या प्रकरणात सुर्याजी पिसाळांचा विजय  दिसत असला तरी रणदिपसिंघ सरदारचे मार्ग अद्याप बंद झाले नाहीत. पुढे काय होईल याचे भवितव्य आज सांगता येणार नाही पण सुर्याजी पिसाळाने केलेली खेळी आज तरी यशस्वी झाली असेच लिहावे लागेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *