नांदेड,(प्रतिनिधी)-काल दिनांक २ नोव्हेंबरच्या रात्री एकांत ठिकाणी दारू पीत बसलेल्या काही मित्रांची एक दुचाकी जबरदस्तीने चार दरोडेखोरांनी चोरून नेली आहे.भाग्यनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नागसेन बालाजी हनवते हे कुरियर बॉय बाबी त्यांचे काही मित्र दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १०.१५ वाजता दारू पिण्यासाठी खंडोबा चौक,सांदिपनी शाळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर दारू पीत बसले होते.कारण नागसेन बालाजी हनवतेला आपल्या लग्नात सासरच्या मंडळीने दिलेली दुचाकी गाडी क्रमांक एमएच २६ बी व्ही ०२२० संदर्भाने पार्टी देणे शिल्लक होते,दारूचे ग्लास भरून पहिला घोट घेण्या अगोदर चार दरोडेखोर आले. त्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून त्यांची दुचाकी बळजबरीने चोरून मालेगाव रस्त्याकडे पळून गेले.हा घटनाक्रम फक्त १० मिनिटात घडला.
भाग्यनगर पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक ३७४/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२,३४ नुसार दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.