नांदेड(प्रतिनिधी)-मोहम्मद आरेफ खान मोहम्मद दुल्हेखान पठाण यांच्यामुळे आणि वास्तव न्युज लाईव्हच्या वृत्तांकनामुळे महाराष्ट्र भूषण शेख जाकीरला आपले लेटरपॅड बदलावे लागले. नवीन लेटर पॅडवर मोहम्मद आरेफ खान विरुध्द अर्ज देवून त्यांनी जगाला काय दाखवले हे लक्षात येईल. मोहम्मद आरेफ खानने न्यायालयाची माफी मागितल्याचे पत्र सुध्दा पुर्वीची माहिती अधिकार संरक्षण समिती आणि आताचे जनहित माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीरने व्हायरल केले होते. जगापुढे वास्तवने वास्तवीकता आणली आहे.
दि.3 नोव्हेंबर रोजी जन हित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले नवीन लॅटरपॅड ज्यावर नोंदणी क्रमांक एफ 0023330/एनएनडी(एम.एच.) लिहिले आहे. जुन्या माहिती अधिकार संरक्षण समितीवर सुध्दा हाच नोंदणी क्रमांक होता. या नवीन लेटर पॅडवर न्यायालयाची व पोलीसांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहम्मद आरेफ खान मोहम्मद दुल्हेखान पठाण रा.देगलूरनाका नांदेड विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्याकडे असलेला अग्नीशस्त्र परवाना रद्द करून पिस्तुल जप्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी मला मिळालेल्या माहिती अंतर्गत अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे. हा अहवाल 23 ऑक्टोबर 2021 रोजी शेख जाकीर शेख सगीरला मिळाला.
शेख जाकीर शेख सगीरने मोहम्मद आरेफ खान पठाणची माहिती मागितली तेंव्हा लिहिलेला अर्ज आणि नवीन लेटरपॅड जोडले तर कोणी फसवणूक केली हे काही आता पुरावा देण्याची गरज शिल्लक न राहिलेला विषय आहे. मोहम्मद आरेफ खान पठाणनेच विश्र्वस्त नोंदणी कार्यालय अर्धापूर येथे दिलेल्या अर्जानंतर आणि वास्तव न्युजने त्या बातम्यांना प्रसिध्दी दिल्यानंतर जनहित माहिती सेवा समिती असे नाव बदलण्याची नामुश्की शेख जाकीर शेख सगीरवर आली आहे. इतरांच्या डोळ्यातील कुसळ शोधतांना आपल्या डोळ्यातील मुसळ मात्र शेख जाकीर शेख सगीरला कधी दिसला नाही. पण आपल्याच हाताने आपलेच सर्व उघडे करून आता दाखवले आहे. माहिती अधिकार संरक्षण समितीचे अनेक अर्ज अनेक कार्यालयांमध्ये आजही अभिलेखात आहेत. तो अभिलेख कसा मिटवता येईल आणि आज तयार केलेला नवीन जनहित माहिती सेवा समितीचा अभिलेख स्वत:च त्याने तयार केला आहे.
मोहम्मद आरेफ खान पठाण विरुध्दचा अर्ज कांही व्हॉटसऍप गु्रपमध्ये शेख जाकीर शेख सगीरने अपलोड केल्यानंतर त्या ग्रुप ऍडमिन यांनी शेख जाकीर शेख सगीरला आपल्या गु्रपमधून रिमुव्ह केले आहे. यावरून काय दिसते हे आता लिहिण्याची गरज नाही. हा अर्ज जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा दंडाधिाकरी यांना, पोलीस अधिक्षक नांदेड आणि पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे नायगाव यांना प्रेषित केलेला आहे. या पुर्वी मोहम्मद आरेफ खान पठाणने दि.23 डिसेंबर 2020 रोजी नायगाव न्यायालयात घडलेल्या घटनेसंदर्भाने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. मोहम्मद आरेफ खान पठाण यांनी माफी मागीतली तेंव्हा पोलीसांकडे दिलेला जबाब याच शेख जाकीर शेख सगीरने व्हॉटसऍपवर व्हायरल केला होता. न्यायालयाचे अवमान कायदा माहित असता तर शेख जाकीर शेख सगीरने 3 नोव्हेंबर रोजी दिलेला अर्ज दिला नसता. यानंतर या अर्जाची दखल होईल तर ती दखल कोणी तरी सुर्याजी पिसाळामुळेच घेतली जाईल हे या भारतीय लोकशाहीतील कायद्याचे दुर्देव आहे.
..अखेर शेख जाकीर शेख सगीरने नोंदणीकृत संस्थेच्या नावाचे लेटरपॅड बनविले ; जुन्या लेटरपॅडची चौकशी कोण करणार ?