पाकिस्तान सैनिकांना धुळ चारणाऱ्या माजी सैनिकाचा पुत्राने केला खून

नांदेड(प्रतिनिधी)-भारत पाकिस्तान युध्दा दुश्मनांना पाणी पाजणाऱ्या माजी सैनिकाला त्याच्याच पुत्राने आपली पत्नी आणि पुत्रासह मिळून दगडाने ठेचून खून केला आहे. हा प्रकार अर्धापूर शहरातील लहुजीनगर भागात 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास घडला.
नारायण साबळे हे 70 वर्षीय माजी सैनिक लहुजीनगर अर्धापूर येथे राहतात. त्यांनी 1965 आणि 1971 च्या भारत पाकिस्तान युध्दामध्ये दुश्मनांना पाणी पाजले होते. या युध्दात त्यांच्या एका पायाच्या मांडीत गोळी लागली होती. त्यामुळे त्यांना अपंगत्व आले आणि मग ते परत घरी आले. त्यांना दिलीप आणि विजय अशी दोन मुले आहेत. आपल्याकडे असलेली संपत्ती दोन्ही मुलांना वाटून दिली. मात्र मोठा मुलगा विजय हा नेहमीच त्रास देत असे की, मला कांही दिले नाही सर्व कांही दिलीप ला दिले. या संदर्भाने सुध्दा अर्धापूर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी आहेत. अर्धापूर पोलीसांनी नारायण साबळे यांचा मोठा मुलगा विजय याविरुध्द प्रतिबंधात्मक कार्यवाहीपण केलेली आहे. अखेर शत्रुला पाणी पाजणाऱ्या नारायण साबळेंचा पराभव आपल्याच मुलामुळे झाला असा हा प्रकार दुर्देवी घडला आहे.
दिलीप नारायण साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास त्यांचे वडील नारायण लक्ष्मण साबळे (70) यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा मोठा भाऊ विजय नारायण साबळे, अनिता साबळे, शुभम साबळे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि याला मारून टाकूत असे म्हणत त्यांच्या डोक्यात दगड मारून, डोके फोडून त्यांचा खून केला आहे. अर्धापूर पोलीसांनी भारतीय संहितेच्या कलम 302, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अशोक जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *