घुमान यात्रेच्या माध्यमातून पंजाबचा आदर्श सेवाभाव अनुभवला – संभाजी धुळगंडे

नांदेड(प्रतिनिधी)- घुमान यात्रेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील बंधू भावाच नात अधिक मजबूत करत करत त्यांचा पंजाबी सेवाभाव अनुभवला,त्यांचा सेवाभाव आदर्श घेण्यासारखाच आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी केले.

संत नामदेव महाराज यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने 23 ते 28 ऑक्टोबर 2021 अशी घुमान यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने मावंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धुळगंडे बोलत होते. डॉ.संजीवन पुणेकर,सौ.नंदिनी पुणेकर यांनी मावंद चे यजमानपद स्वीकारले होते.

संत नामदेव महाराज यांचे सातशे एकावणवे जन्म – शताब्दी वर्ष आहे. यावेळी घुमान याञेनं कात टाकली, यात्रा हवाई मार्गानं घुमानला जाऊन आली. धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेलं समाधानाच धन घुमान यात्रेच्या माध्यमातून यात्रेकरूंनी अनुभवलं असे धुळगंडे यांनी सांगितले.. प्रा. राजेश मुखेडकर, लक्ष्मणराव क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करत घुमान यात्रा म्हणजे मराठी माणसासाठी पर्वणी आहे असे मत त्यांनी व्यक्त केली. सातवी घुमान याञा करोनाला हरवून हवाई प्रवास करून यशस्वी झाली असे नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले.

यावेळी सरदार बलजीतसिंघ धीलो,माजी प्राचार्य किसनराव शिंदे, प्रा.एस.डी.बोखारे,देवराव चिंचोलकर गुरुजी,प्राचार्य भानुदास पुटवाड,संजय जतकर,माजी नगरसेवक पंढरीनाथराव केंद्रे,निवृत्त कार्यकारी अभियंता प्रल्हादराव भालेराव,दिलिप पाटील ,सौ प्रफुल्ला बोकारे,अरुण कुलकर्णी,सौ.अरुणाताई कुलकर्णी,धनंजय उमरीकर, मनोज शिंदे,पुंडलिकराव बेलकर, वसंत राठोड, रमेश दिवटे. राम पाटील पळसेकर,सौ. सिमा पाटील पळसेकर,रामराम मिजगर,सौ. मीनाक्षी मिजगर, संतोष डोंभाळे,सौ. प्रियंका डोंभाळे, अमोल निळेकर,प्रवीण निकेकर,दीपक साबळे, सौ रजनी कुलकर्णी-गिरगावकर,लक्ष्मणराव क्षीरसागर,सौ.उर्मिलाताई क्षीरसागर,प्रा.प्रभाकरराव जाधव,अशोकराव जाधव, देवराव माचापुरे, सौ.अंजनाताई माचापुरे, जनार्धनराव पिन्नलवार,व्यंकटेशराव शिंदे,सौ.उषाताई शिंदे,डॉ.डी.एम.सुरवसे, प्रेरणा सुरवसे,प्रा.डॉ गजानन देवकर,प्रकाश अजमेरा,सौ. किरणताई अजमेरा, सुनिल देशमुख,सौ.चित्राताई देशमुख,,देविदासराव कदम, सौ.सुनिताताई कदम,श्रेयसकुमार बोकारे,ईश्वर कदम हे प्रमूख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *