चार चोरींच्या घटनांमध्ये 2 लाख 81 हजार 123 रुपयांचा ऐवज गायब
नांदेड(प्रतिनिधी)-उस्मानगर नांदेड रस्त्यावर एक जबरी चोरी झाली आहे. तिरुमलानगर वाडी येथे घर फोडण्यात आले आहे. असर्जन गावात एक घर फोडण्यात आले आहे आणि एक मोटारसायकल चोरी झाली आहे. या चार चोरी प्रकरणांमध्ये 2 लाख 88 हजार 123 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
उस्मानगर ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर येवतीकर यांच्या शेताजवळ 7 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.20 वाजता शेख शब्बीर शेख मौला आणि त्यांचा मुलगा दोघे रा.शिराढोण हे ऍटोने भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात असतांना चार दरोडेखोर आले आणि त्यांनी ऍटोचे काच फोडून शेख शब्बीरला खाली ओढून त्यांच्या खिशातील 47 हजार रुपये आणि एक मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते हे करीत आहेत.
नितीन राजेशराव मामीडवार मामीडवार हे शिक्षक तिरुमलानगर वाडी (बु) येथे राहतात. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ते आपल्या कुटूंबासोबत दिवाळी सणानिमित्त आपल्या मुळगावी कंधार येथे गेले होते. 6 नोव्हेंबर रोजी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे लॉक तोडून कपाटातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत 33 हजार रुपयांचे कोणी तरी चोरल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बोरकर अधिक तपास करीत आहेत.
जोगिंदरसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार रा.असर्जन हे 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गुरूद्वारा येथे दर्शनासाठी गेले. ते रात्री 10.45 ला परत आले या दरम्यान कोणी तरी त्यांच्या घरातील बाथरुमची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे अनेक दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 55 हजार 123 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून अत्यंत निष्पक्ष पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे अधिक तपास करीत आहेत.
रविंद्रसिंघ ईश्र्वरसिंघ मदतगार यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.8537 ही 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता गुरूद्वारा गेट क्रमांक 1 जवळून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षकाला दिवाळी महागात पडली दीड लाखांचा ऐवज लंपास