नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे एका मोबाईल टॉवरमधून बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. शहरातील फटाकामार्केटमधून एक दुचाकी आणि सरकारी दवाखान्यातून एक दुचाकी तसेच भोकर शहरातील गुडा महादेव मंदिर रस्त्यावरून एक दुचाकी अशा 3 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. चोरीला गेलेल्या एकूण ऐवजाची किंमत 1 लाख 35 हजार रुपये आहे.
दत्तात्रय गणेशराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबर रोजी एकलारा पाटी जवळ, तामसा येथून मोबाईल कंपनीच्या टावरमधील 45 हजार रुपये किंमतीच्या तीन बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कल्याणकर अधिक तपास करीत आहेत.
अजित वैजनाथ मोरलवार यांची 20 हजार रुपये किंमतीची गाडी क्रमांक एम.एच.26 ए.ई.0068 ही 4 नोव्हेंबरला फटाका मार्केट हिंगोली गेट, येथून चोरीला गेली आहे. विवेकानंद प्रल्हाद कदम यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.8078 ही 4 नोव्हेंबर रोजी सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथून चोरीला गेली आहे. प्रशांत गोबरा आडे यांची 40 हजार रुपये किंमतची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.3909 ही 6 नोव्हेंबर रोजी गुडा महादेव परिसरातून चोरीला गेली आहे.
चोरीच्या चार घटनांमध्ये 1 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास