नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून फरार झालेल्या दोन जणांना काल दि.9 नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आणि त्यांच्या अंमलदारांनी गजाआड केले. आज 10 नोव्हेंबर रोजी या दोन्ही हल्लेखोरांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी इंबीसात देशमुख यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.17 ऑक्टोबर रोजी शेख रशीद शेख राशीद यांच्यावर शेख मुस्ताक शेख बशीर (20) रा.मेहबुबनगर आणि शेख अलीम शेख रहिम (19) रा.कर्मविरनगर या दोघांनी चाकुने हल्ला करून शेख रशीदला हातावर आणि पोटावर जखमा केल्या. हा गुन्हा 20 ऑक्टोबर रोजी दाखल झाला होता. पण हल्लेखोर फरार झाले होते.
विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, बाबा गजभारे, बंडू कलंदर पाटील, दत्ता गंगावरे आदींनी या दोन्ही हल्लेखोरांना पकडले आज दि.10 नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक नागोराव जाधव, पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी शेख मुस्ताक शेख आणि शेख अलीमला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मारहाण करणारे दोन हल्लेखोर विमानतळ पोलीसांनी पकडले