राज्यात 376 एस.टी.कर्मचारी निलंबित; त्यात 116 नांदेड व सांगली विभागाचे

नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या कालखंडात सुरू केलेल्या आंदोलनात एकूण 16 विभागातील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक कर्मचारी 58-58  नांदेड आणि सांगली विभागाचे आहेत.
महाराष्ट्रात एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आपले आंदोलन सुरू ठेवले त्यात सर्वात मोठा फटका प्रवाशांना बसला. सणासुदीच्या काळात जाणे-येणे बंद झाले. खाजगी प्रवाशी वाहतुक करणारी मंडळी लुट करू लागली. शासनाने खाजगी प्रवाशी वाहनांना प्रवाशांची वाहतुक करण्यासाठी परवानगी दिली पण त्याचे कोणतेही दर निश्चित नसल्याने सर्व कांही अरेरावीने सुरू होते. एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडाव्यात याचे कोणाचे दुमत नाही. पण शासनाला एका प्रक्रियेप्रमाणे चालावे लागते. शासनाने सर्व एस.टी.वाहक चालकांना या संदर्भाने नोटीस दिल्या पण संप कांही संपला नाही.
यानंतर शासनाच्यावतीने महाराष्ट्रातील एकूण 16 विभागांमधील 45 आगारात कार्यरत 376 एस.टी.चालक व वाहकांना निलंबित केले आहे. त्यात सर्वाधिक नांदेड विभागातील आहेत. ज्यामध्ये किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हदगाव, मुखेड, बिलोली आणि देगलूर येथील वाहक चालक आहेत. इतर विभागातील निलंबित कर्मचारी पुढील प्रमाणे विभाग नाशिक आगार कळवण कर्मचारी-17, विभाग वर्धा आगार वर्धा-हिंगणघाट कर्मचारी-40, विभाग गडचिरोली आगार आहेरी ब्रम्ळपुरी-गडचिरोली कर्मचारी-14, विभाग चंद्रपुर आगार चंद्रपूर-राजूरा आणि विकाशा कर्मचारी 14, विभाग लातूर आगार औसा-उदगिर-निलंगा-अहमदपूर-लातूर कर्मचारी-31, विभाग भंडारा-आगार तुमसर-तिरोडा-गोंदिया कर्मचारी-30, विभाग सोलापूर आगार अक्कलकोट कर्मचारी-2, विभाग यवतमाळ आगार पांढरकवडा- राळेगाव-यवतमाळ कर्मचारी -57, विभाग औरंगाबाद आगार औरंगाबाद-1 कर्मचारी-5, विभाग परभणी-आगार हिंगोली आणि गंगाखेड-कर्मचारी-10, विभाग जालना आगार जाफ्राबाद आणि आंबड कर्मचारी-16, विभाग नागपूर  आगार-गणेशपेठ-घाटरोड-इमामवाडा-वर्धमाननगर कर्मचारी-18, विभाग जळगाव आगार अंमळनेर-कर्मचारी-4, विभाग धुळे आगार धुळे-कर्मचारी-2, विभाग सांगली आगार जत-पलुस-ईस्लामपूर-आटपाडी कर्मचारी-58 अशा एकूण 376 एस.टी.कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *