नांदेड(प्रतिनिधी)-वसरणी भागात विनायक फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले. अग्निशमन दलाने दोन बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. हा प्रकार आज बुधवारी सकाळी 6 वाजेच्यासुमारास घडला.
लातूर फाट्या जवळ वसरणी परिसरात शामसिंह चौधरी यांची विनायक फर्निचर नावाची दुकान आहे. या दुकानात सकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारापर्यंत काम सुरू होते. काम बंद झाल्यावर सर्व मंडळी बाहेर थांबली असतांना दुकानातून धुर निघू लागला. तात्काळ याची माहिती दुकान मालक यांना कळविण्यात आली. कांही नागरीकांना अग्नीशमन पथकाला माहिती दिली. अग्नीशमन दलाचे प्रमुख शेख पाशा आणि त्यांचे रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळे एमआयडीसी भागातून दुसरा बंब बोलावण्यात आला. दोन तासांच्या मेहनतीने या आगीला शांत करण्यात आले. दुकानातील फर्निचर, इतर साहित्य मिळून जवळपास 20 लाखांचे नुकसान झाले आहे. लाकडावर पॉलिश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे हे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.