अफवांवर विश्वास ठेवू नये नांदेडची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात- जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे

नांदेड (प्रतिनिधी)- त्रीपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले. यात ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्णक कायदा हातात घेऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली.
नांदेड येथील भाईचारा कोरोना काळातही अतिशय संयमाने लोकांनी जपला आहे. तो भाईचारा आणि संहिष्णूता सर्व नांदेडकर मानवी एकतेला जपतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा घटनांमध्ये गोरगरीब व ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. परस्पर सहकार्याची भावना प्राधान्याने विचारात घेऊन सर्व नागरीक पुन्हा विश्वासाने जनजीवन सुरळीत सुरू करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड येथे अतिरिक्त पोलीस दलाची टिम व सुरक्षिततेच्या सर्व यंत्रणा तत्पर दाखल झाले असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *