जिल्हा दोन ठिकाणी जिवघेणा हल्ला 

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील मुदखेड शिवारात एका मेंढपाळाला आणि त्याच्या साथीदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. निळेगव्हाण ता.नायगाव येथे जमीनीच्या वादातून तीन जणांनी एका युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आनंद दासराव पेद्दे यांच्या शेतात मुदखेड शिवारात जमालभाई दवाभाई रबारी (19) हा कच्छ गुजराथमधील युवक आपल्या मेंढ्यांसह बसला होता. त्यावेळी मारोती संभोड, गजानन संभोड आणि बाबू संभोड या तिघांनी आमच्या शेतात मेंढ्या का बसवल्या. त्यांना बाहेर काढा आणि निघून जा असा वाद घालून जमाल भाई रबारी आणि त्याच्या साथीदारांना काठ्यांनी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार जमालभाईने दिल्यानंतर मुखेड पोलीसांनी तिन जणांविरुध्द जिव घेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे अधिक तपास करीत आहेत. आज पकडलेल्या तिन संभोड मंडळीला न्यायालयात हजर केल्यानंतर मुदखेडचे न्यायाधीश ढेंबरे यांनी या तिघांपैकी मारोती संभोडला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
             मौजे निळेगव्हाण ता.नायगाव येथील गोविंद लक्ष्मण गागलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास गंगाधर उर्फ गंगाराम ग्यानोबा गागलवार, अर्जुन गंगाधर गागलवार आणि धनराज गंगाधर गागलवार यांच्यासह एका महिलेने जमीनीचा वाद का वाढवतो असे सांगत हातपाय धरून हातातील कत्तीने गोविंद गागलवाडच्या उजव्या भकाडीत मारून गंभीर दुखापत केली. त्यामुळे माझा जीव जावू शकला असता. कुंटूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 230 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे अधिक तपास करीत आहेत.पकडलेल्या तीन जणांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *