नांदेड(प्रतिनिधी)-एका पोलीस अंमलदाराचा भुखंड वारंवार विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीमधील एकाचा मृत्यू झाला आहे.
पोलीस अंमलदार संभाजी सटवाजी लोकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नालंदा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था( म) सांगवी (बु) येथे त्यंाच्या मालकीचा शेत सर्व्हे क्रमांक 55 मधील भुखंड क्रमांक 71 हा त्यांचा असतांना कांही जणांनी तो विक्री केला. यामध्ये मयत झालेले पुंडलिक खंडेराव सोनकांबळे, श्रीमती पद्मीनबाई विराज इंगोले, वंदना तुळशीराम इंगोले, राहुल नानाराव नरवाडे यांनी हा सगळा घोळ केला आहे. या तक्रारीनुसार विमानतळचे पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांच्या आदेशानुसार गुन्हा क्रमांक 347/2021 कलम 420, 467, 471, 468 आणि 34 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आनलदास यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अंमलदाराचा भूखंड न सांगता विकला; गुन्हा दाखल