नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जांब ता.मुखेड येथे एका युवकाला आपल्याच घरात घेवून त्याचा खून करणाऱ्या 13 आरोपींपैकी चार जण नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाले आहेत. वजिराबाद पोलीसांनी पुढील कार्यवाहीसाठी मुखेड पोलीसांना बोलावून घेतले आहे.
दि.11 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता संतोष संभाजी कटाळे (28) या युवकाचा गावातील कद्राळे कुटूंबीयांनी आपल्या घरातच खून केला. मुखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 13 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 324/2021 दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विलास गोबाडे हे करीत आहेत.
आज दि.12 नोव्हेंबर रोजी 13 मारेकऱ्यांपैकी पुंडलिक बळीराम कद्राळे (36), सिध्देश्र्वर संभाजी कद्राळे(21), संभाजी बळीराम कद्राळे(42), शिवलिंग बळीराम कद्राळे(45) हे चार मारेकरी वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती वजिराबादचे प्रभारी पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत वजिराबाद पोलीसांनी या आरोपींचा ताबा घेण्यासाठी मुखेड पोलीसांना बोलावून घेतले आहे.
मौजे जांब ता.मुखेड येथे खून करणारे चार वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर