नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजी नांदेड बंदच्या नावाखाली हिंदु व्यापारी, जनता, पोलीस आणि पत्रकार यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यासाठी आज विश्र्व हिंदु परिषदेने पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.
दि.12 नोंव्हेंबर रोजी नांदेड बंदच्या नावाखाली कांही समाज विघात हल्लेखोरांनी पोलीस बांधव, हिंदु व्यापारी, जनता आणि पत्रकार यांच्यावर भ्याड हल्ला केला. अनेक गाड्यांची तोडफोड केली. दुकानांची नासधुस केली. आणि गोंधळ घालून अशांतता प्रिय लोकांनी शहरात उच्छाद मांडला. असामाजिक तत्वांवर नांदेड जिल्हा प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. अशा परिस्थितीत असुरक्षीत जनतेच्या मनातील भिती दुर व्हावी यासाठी या समाज विघात लोकांवर त्वरीत कार्यवाही करावी. हल्लेखोरांवर कार्यवाही न झाल्यास विश्र्व हिंदु परिषद, बजरंग दल व इतर हिंदु संघटना एकत्रीतपणे तिव्र आंदोलन करतील असा इशारा या निवेदनात लिहिला आहे. या निवेदनाद्वारे विश्र्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री शशीकांत पाटील यांची स्वाक्षरी आहे.