नांदेड(प्रतिनिधी)-आंतरराष्ट्रीय स्तराचे पत्रकार शेख याहीया शेख इसाक (42) यांच्या विरुध्द एका 23 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय दंड संहिता, काळी जादु अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर आज दि.14 नोव्हेंबर रोजी शेख याहियाला न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी ईंबिसात देशमुख यांनी शेख याहियाला 6 दिवस अर्थात 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका 23 वर्षीय महिलेचे लगनानंतर सासरी संबंध बिघडले. या प्रकरणाचा सुगावा शेख अजिज बाबा या व्यक्तीला लागला. तुझा संसार पुन्हा सुरळीत करून देवू असे आमिष त्याने त्या युवतीला दाखवले. लग्न झाल्यानंतर एक मुलगा झाला होता. त्याचे वय 4 वर्ष आहे. आपला संसार सुरळीत चालावा म्हणून त्या युवतीने शेख अजीज बाबाच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत आपल्या समस्येविषय नेहमी चर्चा केली. मंत्र तंत्र म्हणून शेख अजीज बाबा याने त्या युवतीला अनेक वेळेस पाणी दिले आणि तीने ते पाणी प्राशन केले. तुझ्यावर असलेल्या समस्यांसाठी तुला औषध पण घ्यावे लागेल. तुझ्या शरीरावर कांही औषध लावावे लागेल असे सांगून त्याने एक दिवशी त्या युवतीला ते औषध दिले. नैसर्गिक अवस्थेत असलेल्या या मुलीसोबत अजीज बाबाने अत्याचार केला. नुसता अत्याचार केला नाही तर तिचे फोटो व व्हिडीओ काढले. आपली गुंगी उतरल्यानंतर युवतीने याबाबत विचारणा केली असता अजीज बाबाने तिचे फोटो व व्हिडीओ तिला दाखवले आणि कोणाला काही सांगितले तर या फोटो व व्हिडीओचा गैरवापर करील असे सांगिले. तसेच माझ्या चार वर्षाच्या मुलाला खतम करून टाकील अशी धमकी दिली आणि माझ्यासोबत नेहमी जबरी अत्याचार केला. युवतीकडील दोन सिमकार्ड असलेला एक फोन पण घेवून गेला.
दि.10 नोव्हेंबर रोजी शेख याहिया नावाचा व्यक्ती शेख अजीज बाबासोबत आला आणि त्याने माझे फोटो माझ्या बहिणीला व्हॉटसऍपवर पाठविले तसेच माझ्यासोबत अश्लील छेड छाड करून माझ्याकडून शरीर सुकाची मागणी केली. शेख याहीयाने अश्लील भाषेत बोलून माझा विनयभंग केला आणि माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे असे तक्रारीत लिहिले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 812/2021 दाखल केला आहे. त्यात भारतीय दंड संहितेची 376(2)(एन), 354(अ), 450, 500, 506 सोबत माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66(ई) सोबतच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुश, अनिष्ट, अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन, काळा जादू नियम 2013 मधील कलम 3 जोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे देण्यात आला.
आज दि.14 नोव्हेंबर रोजी 02.16 वाजता शेख याहियाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार फयाज सिद्दीकी, शेख रब्बानी, ज्ञानेश्र्वर कौठेकर, रेवणनाथ कोळनुरे आदींनी शेख याहिया शेख ईसाक (42) यास न्यायालयात हजर केले. आपल्या अत्यंत जबरदस्त वकृत्वाने अशोक घोरबांड यांनी न्यायालयात पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे याचे जबरदस्त सादरीकरण केले. अशोक घोरबांड यांचा युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायाधीश देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय स्तराचे पत्रकार शेख याहिया शेख ईसाकला सहा दिवस अर्थात 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आंतरराष्ट्रीय पत्रकार शेख याहीयाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक ; 6 दिवस पोलीस कोठडी