नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस कोठडीत असलेल्या पवन जगदीश बोरा उर्फ शर्माकडून अद्याप पोलीसांना त्याने फिर्यादीला दाखवलेली पिस्तुल जप्त करता आली नाही. उद्या त्याची पोलीस कोठडी संपणार आहे. लॉकअपमध्ये असतांना पवन बोरा पोलीसांना सांगत आहे. डीआयजी तर सोडा हो मला भेटायला दोन आयजी आले होते.
3 नोव्हेंबर रोजी धनराज बद्रीनारायण मंत्री या फटका व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 397 मध्ये काल दि.13 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने पवन जगदीश बोरा उर्फ शर्माला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले. 15 नोव्हेंबर रोजी त्याची पोलीस कोठडी संपणार आहे. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अद्याप वृत्तलिहिपर्यंत पोलीसांना त्याने फिर्यादी धनराज मंत्रीला दाखवलेली पिस्तुल जप्त करता आली नाही.खात्रीलायक सुत्रांनी सा ंगितलेल्या माहितीप्रमाणे पोलीस कोठडीत असतांना पवन जगदीश बोरा हा पोलीसांना सांगत आहे की, डीआयजी तर सोडा मला तर भेटायला कालच दोन आयजी आले होते. यावरून पवन जगदीश बोरामध्ये असलेल्या खुमखुमीचा अंदाज येतो. पोलीसांनी त्याच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दिली होती. तर मग पोलीसांना पिस्तुल कसे सापडत नाही हा प्रश्न आहे. त्याच्याकडे असलेले पिस्तुल परवान्याचे आहे आणि ते सुध्दा पोलीस अद्याप शोधू शकले नाहीत.
नांदेड उपविभागाचे अत्यंत दमदार पोलीस उपअधिक्षक गुन्हा कसा दाखल झाला याची चौकशी करतात पण गुन्ह्याची योग्य निर्गती करण्यामध्ये त्यांचा कांही रस नाही काय? त्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या या गुन्ह्याची जबाबदारी एक पोलीस उपअधिक्षक म्हणून त्यांची नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीसांचा फिर्यादीच्यावतीने गुन्ह्यात रस असावा असा नियम आहे असो. 29 ऑक्टोबर रोजी घटना घडली तेंव्हा पवन जगदीश बोरा चार चाकी वाहनात बसून फटका व्यापाऱ्यांच्या दुकानात आला होता ती चार चाकी गाडी सुध्दा आता गुन्ह्यात सहभागी झाली आहे. कमीत कमी त्या गाडीचा तर शोध लावावा, ती जप्त करावी अशी अपेक्षा व्यकत होत आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी बारकाईने लक्ष ठेवून असतांना असे घडत आहे म्हणूनच पोलीसांविषयी म्हटले जाते की, “पोलीस खाते करील तेच होईल’. समाजाला त्रास देणाऱ्या या लोकांविषयी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी दाखवलेली भुमिका प्रशंसनिय आहे.
अद्याप दोन आरोपी फरार; दाखल केले अटकपुर्व जामीन अर्ज
या प्रकरणात दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन हे दोन फरार आहेत. या दोघांच्यावतीने फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 893 आणि 899 नांदेड जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्या बाबत ई कोर्ट सर्व्हीसमध्ये माहिती घेतली असता दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांच्याप्रकरणात पुढील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच गौतम जैन यांच्या जामीन अर्जाच्या पुढील सुनावणीची तारीख ई कोर्ट सर्व्हीसमध्ये 12 नोव्हेंबर 2021 अशी दाखवत आहे.
डीआयजी सोडा हो मला भेटायला दोन आयजी आले होते इती पवन जगदीश बोरा