नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी झाली. याप्रसंगी बाल दिनानिमित्ताने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बालकांना सुध्दा शुभेच्छा ज्ञापीत केल्या.
आज 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती आहे. याच दिवसाला बाल दिन म्हणून सुध्दा साजरा केला जातो. बालकांवर पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे असलेले प्रेम जगविख्यात आले. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक गृह विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी देशातील बालकांना शुभकामना प्रेषित केल्या. या कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क विभागातील सुर्यभान कागणे, अफसर खान, विनोद भंडारे आदींनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी