नुकसान वसुलीची कार्यवाही करणार
नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजी शहरात घडलेल्या दुर्देवी प्रसंगातील लोकांच्या झालेल्या नुकसानीबाबत आयोजकांकडून हे नुकसान वसुल करण्याची कार्यवाही होणार आहे. याच पार्श्र्वभुमीवर 16 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असलेला मोर्चा स्थगित करावा असे संयुक्त आवाहन जिल्हाधिकारही डॉ.विपीन आणि प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयाने प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या पत्रकानुसार आणि कांही पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीनुसार 12 नोव्हेंबरच्या पार्श्र्वभूमीवर राम जन्मोत्सव समिती, विश्र्व हिंदु परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी आणि इतर अनेक संघटनांनी 16 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात सोशल मिडियावरून अनेक पोस्ट व संदेश व्हायरल होत आहेत. यावर जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी संयुक्तरित्या असे सांगितले आहे की, मोर्चात प्रमुख असलेले संतोष उर्फ कालू ओझा, डॉ.नारलावार, प्रविण साले, दिलीपसिंघ सोढी, दिलीप ठाकूर, विजय गंभीरे, आशिष नेरलकर, कृष्णा देशमुख, शशिकांत पाटील, महेश देबडवार आदी व्यक्तींशी चर्चा झाली. त्यात प्रशासनाच्यावतीने 12 नोव्हेंबर संदर्भाने दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती त्यांना देण्यात आली. सोबतच आतापयर्र्ंत अटक केलेल्या माणसांची संख्या सांगण्यात आली. फरार आरोपींना पकडण्यासाठी विविध पथके कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. सोबतच प्रत्येक दोषीवर कार्यवाही होणारच अशी ग्वाही देण्यात आली. विविध लोेकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यात येत असून आयोजकांकडून त्याची नुकसान भरपाई वसुल करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे असे सांगितले.
या चर्चेनंतर डॉ.विपीन यांच्या सांगण्याप्रमाणे या सर्व लोकांनी मोर्चा रद्द करू असे सांगितले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार 12 नोव्हेंबरच्या घटनेवर आम्ही दोषींविरुध्द कडकच कार्यवाही करणार आहोत. तेंव्हा 16 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असलेला मोर्चा स्थगित करावा असे आवाहन मी करतो आहे.