नांदेड(प्रतिनिधी)-आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवादन केले.
15 नोव्हेंबर हा दिवस भारतातील आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांचा जन्मदिन आहे. आज पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक कोटतिर्थवाले यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनी आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आपले श्रध्दा सुमन अर्पित केले. जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे, अफसरखान आणि विनोद भंडारे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी