बुलढाणा अर्बन नांदेड व धर्माबाद शाखांमध्ये आयकरची एकाच वेळेस धाड

नांदेड(प्रतिनिधी)-बुलढाणा अर्बन के्रडीट सोसायटीच्या नांदेड आणि धर्माबाद येथील दोन कार्यालयांवर एकाच वेळी आयकर विभागाने पुन्हा एकदा छापा टाकला आहे. वृत्तलिहिपर्यंत नांदेड येथील व्यवस्थापकांना आयकर विभागाचे अधिकारी आल्यानंतर आलेल्या घेरीवर उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.
कांही दिवसांपुर्वी धर्माबाद येथील बुलढाणा अर्बन क्रेडीट कॉपर्रेटीव्ही सोसाटीवर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्या छाप्यामध्ये या सोसायटीत जवळपास 1200 बेनामी खाते असल्याचे दिसले होते. त्यात जवळपास 60 कोटीची उलाढाल झालेली होती. या प्रकराला दोन आठवडे पुर्ण होत नाहीत त्यात आज नवीन प्रकार घडला आहे.
आज नांदेड येथील व्हीआयपी रोडवर असलेल्या बुलढाणा अर्बनच्या कार्यालयात आणि धर्माबाद येथे आयकर विभागाने एकदाच छापा टाकला. या छाप्याचे कारण काय याची माहिती मात्र अद्याप प्राप्त झाली नाही. पण दरम्यान नांदेड कार्यालयातील बुलढाणा अर्बनच्या व्यवस्थापकाला आयकर विभाग पाहताच घेरी आली त्यामुळे त्यांना त्वरीत उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. तरीपण बुलढाणा अर्बनची तपासणी सुरू आहे. बेनामी खात्यांमधून बेनामी संपत्ती दडवणे, दोन नंबरची रक्कम एक नंबर करणे किंवा सोने तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जातील प्रकारांमुळे असे घडले असेल अशी चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *