नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबरच्या घटनेत नांदेड जिल्हा पोलीस दलाने आता पर्यंत 67 आरोपी अटक केले आहेत. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
12 नोव्हेंबर रोजी शहरातील शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा आणि नांदेड ग्रामीण या ठिकाणी चार गुन्हे दाखल झाले. त्यात काल दि.16 नोव्हेंबरपर्यंत 51 गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. आज 16 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर गुन्ह्यातील 1, वजिराबाद गुन्ह्यातील 2 आणि इतवारा गुन्ह्यातील 13 अशा एकूण 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटकेचा एकूण आकडा 67 झाला आहे अशी माहिती पोलीस जनसंपर्क विभाग नांदेड यांनी दिली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अनेक पथके कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
12 नोव्हेंबरच्या घटनेत आता 67 जणांची अटक