नांदेड(प्रतिनिधी)-भाडे तत्वावर गोडाऊनमध्ये ठेवलेला 1 कोटी 66 लाख 79 हजार 430 रुपयांचा शेत माल परस्पर विक्री करण्याचा प्रकार हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दी घडला आहे.
शिवाजी दत्तराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जय केदारनाथ ऍग्रो हाऊसमध्ये त्यांच्यासह 19 जणांनी हरभरा, सोयाबीन, तूर, हळद असे पिक त्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. या सर्व पिकांची किंमत 1 कोटी 66 लाख 79 हजार 430 रुपये आहे. हे सर्व पिक गोडाऊन मालक पंडीत पंतगराव कदम आणि प्रशांत पंडीतराव कदम दोघे रा.बोरबन उमरखेड यांनी परस्पर बॅंकेचे त्या पिकावर कर्ज काढून ते पिक फिर्यादी व साक्षीदारांना न विचारता विक्री केले आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 302/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 406 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे हे करीत आहेत.
गोदामातील शेतकऱ्यांचा 1 कोटी 67 लाखांचे पिक परस्पर विक्री केले