नांदेड(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या एका व्यक्तीने 19 मे 2021 रोजी बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या लेटर पॅडवर नवीन अर्ज दिला आहे. खरे तर या अर्जात बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीची चौकशी सुध्दा होणे गरजेचे आहे.
19 मे 2021 रोजी फेराज खान अली खान पठाण नावाच्या व्यक्तीने उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव, तहसील हदगाव आणि मुख्याधिकारी नगर परिषद हदगाव यांना एक अर्ज दिला आहे. ज्यामध्ये शहरातील काही दुकानदारांचा उल्लेख करून हे विहित वेळेनंतर व्यवसाय करतात असा उल्लेख त्या अर्जात आहे. बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर असलेल्या फेरोजखान विरुध्द शेख खाजा शेख सादीक या व्यक्तीच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 229/2020 हा गुन्हा खंडणीसाठी दाखल केलेला आहे.
या फेरोज खान पठाण याने दिलेले निवेदन माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ज्याचा नोंदणी क्रमांक एफ-0023330/एनएनडी(एम.एच.) असा आहे. या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर हा असल्याचे या लॅटर पॅडवर लिहिलेले आहे. जर माहिती अधिकार संरक्षण समिती अस्तित्वातच नाही असे संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर सांगतो तर ही माहिती अधिकार संरक्षण समिती बोगसच आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी याच नोंदणी क्रमांकानुसार जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य असे लिहुन नवीन लेटरपॅड तयार केले. म्हणजे आपणच बोगस आहोत हे शेख जाकीर शेख सगीरने दाखवले तरीपण दुर्देव या भारतीय लोकशाहीचे मी बोगस आहे हे स्वत: सांगणाऱ्या माणसावर सुध्दा कायदेशीर कार्यवाही करण्याला कोणीही शासकीय अधिकारी धजावत नाही.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी खंडणीसाठी त्रास दिला असेल, कोणी कोणाच्या संपत्तीत प्रवेश केला असेल, कोणी कोणाचे वाहन रोखले असेल तर हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे. त्यासाठी पोलीसांशी संपर्क साधावा आणि तक्रार द्या. पोलीसांच्याविनंतीला कांही जणांनी कांही जणांच्या संदर्भात प्रतिसाद दिला आहे. पण इतर अजूनही उजळ माथ्याने फिरत आहेत. जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य या शब्दांच्यावर माझ्या कल्याणीच्या प्रेमार्थ समिती असे लिहिले आहे. या नोंदणी क्रमांकाचे बायलॉज पाहिले तर त्यामध्ये असा कोणताही उल्लेख नाही. अगोदरच बोगस असलेल्या शेख जाकीर शेख सगीरने नवीन लेटरपॅड बनवून त्यावर नोंदणी क्रमांक एफ-0023330/एनएनडी(एम.एच.) मध्ये पुन्हा त्या समितीत नसलेल्या शब्दांचा उल्लेख करून नवीन बोगसगिरी दाखवली आहे. या संदर्भाने सुध्दा कोणी त्याला का विचारणा करत नाही हा प्रश्न समोर येत आहे.
भारताच्या तिरंग्याला नमस्कार न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्याजवळ बसून मी नांदेड जिल्हा चालवतो हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बोगस शेख जाकीर शेख सगीर नावाच्या व्यक्तीच्या पापाचे शंभर घडे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे व्हॉटसऍप संकेतस्थळावर घाण कॉमेंटस् करून मी मोठा आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख जाकीरने त्याच्या संदर्भाने लिहिलेले जुने लिखाण पुन्हा एकदा वाचावे त्याचा गुरू ज्याने त्याला शिकवणे त्याने आमच्याबद्दल वाईट शब्द बोलल्यानंतर देवाने त्याला आपली सेवा करण्यासाठी बोलवून घेतले हे सुध्दा विसरायला नको.
व्हॉटसऍप संकेतस्थळावर कॉमेंट करून बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचे काम सुरू आहे