नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि.19 नोव्हेंबर रोजी झालेल्या एका लुट प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या गुन्ह्यातील लुटलेला ऐवज कमी दाखवा पण रिक्वरी पुर्ण करतो अशी मांडवली सुरू आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील हा पहिलाच प्रकार नव्हे.
काल 19 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई कमान जवळ कांही जणांनी एका सराफा व्यापाऱ्याला लुटले आहे. तो तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर लुटल्या गेलेल्या ऐवजाच्या तुलनेत कमी ऐवज दाखवा, आम्ही गुन्हा दाखल करतो पण तुमचा लुटला गेलेला पुर्ण ऐवज जप्त करून देतो अशा प्रकारची एक नवीन मांडवली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आज 20 नोव्हेंबर रोजी सुरू आहे.
या संदर्भाने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कमी किंमत दाखवल्याने गुन्ह्याचे स्वरुप बदलते आणि त्याचा परिणाम प्रभारी पोलीस अधिकाऱ्यावर होत असतो असे जुन्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणून अशा खेळी केल्या जातात. असे तो पोलीस अधिकारी सांगत होता. आज 20 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक सराफ व्यापारी जमलेले आहेत. ते सराफा व्यापारी या भागात गुन्ह्याची संख्या वाढल्यामुळे पोलीसांवर रोष व्यक्त करत आहेत. लुट झाली असेल तर गुन्हा दाखल करावाच लागेल. पण कमी किंमत दाखवा ही ओढा ताण का होत आहे. हे शोधण्यासाठी पोलीसांना एक संशोधन समिती स्थापित करावी लागेल. वृत्तलिहिपर्यंत, दुपारी 2 वाजेपर्यंत हा गुन्हा दाखल झाला नव्हता या बाबीला कोणीही दुजोरा दिलेला नाही.
सराफा व्यापाऱ्याला लुटची किंमत कमी दाखवा यावर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे मांडवली