नांदेड(प्रतिनिधी)-बोंढार शिवारात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या छोटा हत्ती या वाहनात लपवून आणलेल्या बायोडिझलप्रकरणी त्या गाडीच्या चालकाला पाचव्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल रात्री स्थानिक गुन्हा शाखेने बोंढार हद्दीत छोटा हत्ती हे वाहन क्रमांक एम.एच.38 ई.1438 पकडले. यामध्ये संपुर्ण वाहन ताडपत्रीने झाकुन त्यात जवळपास 93 हजार 600 रुपये किंमतीचे जवळपास 1200 लिटर बायोडिझेल होते. हे बायोडिझेल 78 रुपये प्रतिलिटर प्रमाणे काळ्या बाजारात विक्री होत असते. छोटा हत्ती आणि बायोडिझेल असा 4 लाख 18 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाची तक्रार नायब तहसीलदार दिपक पार्श्र्वनाथ मरळे यांनी दिली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 819/2021 जीवनावश्यक वस्तु कायद्याच्या कलम 3 आणि 7 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्याकडे देण्यात आला.
आज 20 नोव्हेंबर रोजी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस अंमलदार शेख रब्बानी व इतर यांनी या प्रकरणातील अटक केलेला चालक मुतहार खान महेबुब खान (20) रा.सिध्दनाथपुरी चौफाळा यास न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड. आर्शीया सौदागर यांनी मांडलेला युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी मुतहार खानला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणी एकाला पोलीस कोेठडी