उद्या वाघाळा येथे अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती सोहळा

नविन नांदेड (प्रतिनिधी)-दत्त मठ संस्थांन वाघाळा येथे अखंड दत्तनाम चातुर्मास सोहळा दि.२२ नोव्हेंबंर रोजी आयोजित करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी मिरवणुक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती सोहळा गुरु आनंदगिर महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने आयोजित करण्यात आला असून प्रमुख गुरुवर्य श्री गुरु रुद्रगिरी महाराज किवळेकर ,श्री गुरु समगिरी गुरु जयगिरी महाराज, श्री गुरु दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांची उपस्थिती राहणार असून सकाळी ६ वाजता आरती व १०वाजता पालखी मिरवणुक, दुपारी ११ ते १२ श्री गुरु रुद्रगिर, गुरु दयालगिर किवळेकर महाराज यांचे प्रवचन, आरती व महाप्रसाद, रात्री ८ वाजता ३२ श्रीफळाची आंंनद दत महापुजा व महापुजेवरील आयोजक म्हणून संत राम महाराज गाडे  व भोग गुरुजी हे राहणार असून महा पुजेला वाघाळा,सिडको, हडको, गोपाळ चावडी, पावरलूम, ढाकणी, असदवन, झरी, बोरगांव, नांदगाव, किवळा, टाकळगाव, वडगाव, कौडगाव,वाका यासह इतर ग्रामीण भागातील भजनी मंडळाची उपस्थिती राहणार असून चातुर्मासातील नैमित्तिक भजनी ,बाबुराव पा. घोगरे,लालाजीराव पा. घोगरे,गंगाधर वडजे पा., माधवराव पा. पुयड, विठ्ठल पा. घोगरे, आबाजी पा.घोगरे  मधुकर घोगरे ,पा.महेश घोगरे शिवाजी धोंडिबा घोगरे ,गंगाधर पा.घोगरे ,दिपक पा.खैरे,गणपत पा.घोगरे,लक्षमण हाटकर,श्रीराम पा.इंगेवाड,शंकर पा.काळेवाड, संतोष पा.खैरे हे होते तर पुजारी म्हणून शिवाजी दिगांबर पुरी महाराज राहणार आहेत .या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *