नांदेड(प्रतिनिधी)- सर्वसामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेत सरकारने काम करायचे असते ही अपेक्षा महाराष्ट्र शासनाने पुर्ण करत दारु (मदीरा) स्वस्त केली आहे. यामुळे दारुच्या बाटल्या विक्रीची संख्या दीड लाखाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसरीकडे शासनाचा महसुलपण वाढणार आहे. कारण सर्वात जास्त महसुल दारु विक्रीतूनच शासनाला मिळत असतो.
सर्वसामान्य माणसासाठी शासन काम करत असते असे शासन लोकप्रिय पण असते. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून दारुवरील उत्पादन शुल्क 150 टक्के कमी केला आहे. राज्यात या निर्णयामुळे एक लाख दारु बाटल्याची विक्री वाढून अडीच लाख होणार आहे. पर्यायाने त्यामुळे शासनाचा महसुल पण वाढणार आहे. शासनाने उत्पादन शुल्क आयात केलेल्या मदीरेवर 50 टक्के कमी केला आहे आणि स्कॉच, व्हीस्कीवरील उत्पादन शुल्क 300 टक्यावरून 150 टक्के केला आहे.
कांही जाणकार मंडळी सांगतात यामुळे बनावट दारुवर सुध्दा मोठा वचक येईल. त्यामुळे मदीरा शौकीनांना चांगल्या प्रतिची आणि निर्भेळ दारु उपलब्ध होईल. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केल्यामुळे कांही राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले. त्या तुलनेत राज्य सरकारनेपण पेट्रोल डिझेलवरील कर कमी करणे अपेक्षीत होते. पण महाराष्ट्र शासनाने त्या पेक्षा चांगले काम केले आणि दारु वरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला कमी किंमतीत उच्च प्रतिची मदिरा उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
मदीरा शौकीनांना कमी पैशात उच्च प्रतीची मदिरा उपलब्ध होणार ; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय