नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने तीन जणांना पकडून त्यांच्याकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त केले आहेत. या तिघांमध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. पकडलेल्या दोघांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास एका दुचाकीवर तीन जण आले आणि विश्रामगृहासमोरच्या रस्त्यावर त्याला अडवून, मारहाण करून त्याचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला. यावेळी अब्दुल जफीर अब्दुल वाहेद खान यांचा मोबाईल त्या चोरट्यांनी चोरून नेला होता आणि मोटासायकलवर बसून पळून गेले. याबाबत शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 457/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक देवकत्ते यांच्याकडे आहे. मोबाईलवर बोलतांना पायी जाणाऱ्या लोकांचे मोबाईल, एकट्याला गाठून त्याचे मोबाईल चोरण्याचे जबरी प्रयत्न सुरूच आहेत. या संदर्भाने पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक देवकत्ते, पोलीस अंमलदार मुंडे, मोरे, हेबतकर, मधुकर, राजू, पठाण, जगताप आदींनी तीन जणांना ताब्यात घेतले. यापैकी एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
वयस्क असलेले युवक बबन चंद्रकांत नवघरे (19), बुध्दभूषण विनायकराव पाईकराव (19) दोघे रा.जयभीमनगर यांना पकडून शिवाजीनगर पोलीसांनी त्यांच्याकडून 60 हजार रुपयांचे सहा मोबाईल आणि बळजबरी चोरी करतांना वापरलेली 50 हजारांची दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आज पोलीस उपनिरिक्षक देवकत्ते यांनी पाईकराव आणि नवघरे या दोघांना न्यायालयासमक्ष हजर केल्याने न्यायालयाने न्यायालयाने या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मोबाईल चोरट्यांना पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने तीन मोबाईल चोर पकडले; त्यात एक अल्पवीयन बालक