नांदेड(प्रतिनिधी)- संत साईबाबांच्या जन्मभुमीत आ. दुर्राणी अब्दुल्ला खान (बाबा जानी) यांना एका गुंडांना स्मशानभुमीत बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्यासंबंधाने या गुंडावर एमपीएडी कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे निवेदन खुद्द बाबा जानी यांनी आज पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना दिले.
आज दि. 22 नोव्हेंबर रोजी पाथरी जि. परभणीचे आ. बाबा जान नांदेड शहरात पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयात आले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, पाथरी येथे मी तिसऱ्या फेरीत आमदार आहे. संत साईबाबांची जन्मभुमी अशी या गावाची ख्याती असून या गावात गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती मोहंमदबीन सईदबीन किलेब आणि त्याचा मुलगा सईदबीन मोहंमदबीन किलेब या दोघांनी पाथरी शहरातील नागरिकांना दमकावणे, मारहाण करणे, गोरगरीबांच्या मालमत्ता बळकावणे, अवैध शस्त्र बाळगणे आणि दहशत निर्माण करणे असे काम करत आहेत. आमली पदार्थांची तस्करी करणे, मुलींची छेड काढणे या सर्व अवैध कामांना पाथरी पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

दि. 18 नोव्हेंबर रोजी गुरूवारी मी एका अंतयात्रेत गेलो असताना त्या दुखमय वातावरणात या दोन्ही गुंडांनी माझ्यावर पिस्तुल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली आणि मारहाण सुद्धा केली. याबाबत पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाथरी शहरात तणाव वाढला आहे आणि शांततामय पाथरी गावात या दोन गुंडांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून मोहंमदबीन सईद बीन किलेब आणि त्याचा मुलगा सईदबीन मोहंमदबीन किलेब या दोघांविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करावी असे निवेदनात लिहिले आहे. हे निवेदन आ. बाबा जानी यांनी शिष्टमंडळासह पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांना दिले आहे.