दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त आहे, प्रमोदकुमारजी आपण नाव कमावण्यात व्यस्त राहा !

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार परसरामजी शेवाळे यांचा 25 नोव्हेंबर हा जन्मदिन. आज ते आपल्या जन्माचे 51 वर्ष पुर्ण करून 52 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या जीवनात एकाचवेळी हजार ध्येय ठेवण्यापेक्षा हजारवेळा एकच ध्येय ठेवत त्यांनी आपल्या माता-पित्यांच्या आशिर्वादाने आज आयपीएस अधिकारी म्हणून नाव गाजवित आहेत. एकच ध्येय हजारवेळा ठेवल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात यशाचा ईतिहास घडवला आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी असतातच. पण प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या मनावर विजय मिळवला आणि आपोआपच त्या अडचणीतून मार्ग दिसले आणि त्या मार्गांवर आपले मार्गक्रमण करत त्यांनी आज जवळपास दीड वर्षापासून नांदेड जिल्ह्याचा कार्यभार पोलीस अधिक्षक या पदावर सुरू ठेवला आहे. नांदेड जिल्ह्यात सुध्दा अनेक अडचणी आल्या. कांही सुर्याजी पिसाळांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. त्यात सुध्दा आपल्या मनाचे धैर्य कायम ठेवत आपल्या प्रमोद नावाप्रमाणे जिल्ह्यात आनंदच ठेवला आहे. 

दि.25 नोव्हेंबर 1970 रोजी परसरामजी आणि आई सरस्वतीजी यांच्या बागेत प्रमोद नावाचे एक फुल उमलले. परसरामजी भुमिअभिलेख कार्यालयात लिपीक होते. त्यामुळे त्यांच्या बदल्यांसोबत प्रमोदकुमार यांचे शैक्षणिक जीवन वेगवेगळ्या संस्थांमध्ये झाले. आज परसरामजी आपल्या कुटूंबात नाशिक शहरात वास्तव्याला आहेत. प्रमोदकुमार यांच्यानंतर एक लहान भाऊ रविंद्र आणि बहिण मिणा अशी दोन भावंडे आहेत आणि ते आप-आपल्या पायावर उभे असून आपल्या जीवनात समाजाच्या सेवेसाठी काम करण्याची वृत्ती घेवून काम करत आहेत. प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आपली प्रगती कायम ठेवून राहुरीच्या कृषी विद्यापीठातून बीटेक ऍग्री ही पदवी 1992 मध्ये संपादन केली. 1994 मध्ये त्यांनी राज्यसेवेची परिक्षा दिली. त्याचा निकाल 1995 मध्ये आला आणि प्रत्यक्षात पोलीस उपअधिक्षक पदावर 1996 मध्ये ते रुजू झाले. आपले प्रशिक्षण कालावधी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घालवले. या जिल्ह्याला नक्षलवादी आधार आहे. त्यानंतर 1999 ते 2002 या कालखंडात त्यांनी कुरखेडा कॅम्प वडसा जिल्हा गडचिरोली येथे आपली सेवा दिली. या जिल्ह्यात तर त्या काळात नक्षलवाद्यांचा प्रभाव अत्यंत जोरदार होता. दरम्यान सन 2002 मध्ये प्रमोदकुमार यांच्या जीवनात सारीकाजींचे आगमन झाले. म्हणतात ना ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी-कोणाच्या आयुष्यात येत नाही, फक्त सुर जुळले की, बघा आयुष्य कसे बहरदार फुलते या विचाराप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या कार्यकाळात प्रमोदकुमार शेवाळे यांच्या जीवनात आलेल्या सारकाजींनी त्यांना आदित्य आणि श्रावणी ही दोन अपत्ये प्रदान केली. फुले नित्यच फुलतात, ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणस न कळत मिळतात आणि त्या जोडणीतून घडलेला परिणाम हा संपुर्ण आयुष्याचा मेळ कसा सुंदर असतो हे सरीताजींनी दाखवले. सरीताजींच्या ओ ला प्रतिसाद देतांना प्रमोदकुमार शेवाळे यांनी माझ्या डोळ्यात नेहमी तुझ्या मनातील हिरवळ असते आणि ती फुल होवून मी माझ्या हृदयात साठवून घेतो हा प्रतिसाद म्हणजे आज आदित्य जगविख्यात ऍरिझोना विद्यापीठात शिक्षण घेत आहेत आणि श्रावणी या सध्या 12 वीच्या विद्यार्थीनी आहेत. त्यानंतर सन 2002 ते 2006 धुळे शहर, शिरपुर या ठिकाणी काम केले. 2006 मध्ये अपर पोलीस अधिक्षक पदाची पदोन्नती मिळवून त्यांनी नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड, पुणे येथे प्राचार्य म्हणून काम केले. पुढे 2009 ते 2011 या दरम्यान त्यांनी धुळे जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक पदाची सेवा दिली. जून 2011 ते मे 2013 दरम्यान त्यांनी पोलीस उपआयुक्त पनवेल (नवीमुंबई) येथे काम केले. पुढे 2013 ते 2015 या कालखंडात कोकण परिक्षेत्रात पोलीस अधिक्षक पीसीआर या पदावर आपली सेवा दिली. त्यानंतर 2015 ते 2018 या दरम्यान उपसंचालक राज्यगुप्त वार्ता विभाग मुंबई येथे काम केले. 2018 ते 2020 या दरम्यान त्यांनी उल्हासनगर या मुंबईच्या उपविभागात पोलीस उपआयुक्त पदावर काम केले. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक या पदावर झाली.
आपल्या पोलीस सेवा काळाची आठवण करतांना प्रमोदकुमार शेवाळे सांगतात. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ.भुषणकुमार उपाध्याय, जगन्नाथन, रविंद्र केदारी आणि हिंमतराव देशभ्रतार या अधिकाऱ्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दाखवलेले मार्ग आपल्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण होते असे प्रमोदकुमार शेवाळे यांना वाटते. आर्य चाणक्य म्हणतात गुरूच्या हातात प्रलय आणि निर्माण या दोन्हींचे वास्तव्य त्याच्या कुशीत असते म्हणून माझ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला निर्माण शिकवले आणि मी आज सुध्दा माझे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडून सुध्दा निर्माण शिकतो आहे आणि त्यावरच काम करतो आहे असे ते सांगतात. माझ्यापेक्षा कमी पदातील अधिकाऱ्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ आणि सध्या देगलूर येथे कार्यरत असलेले सचिन सांगळे यांना मी एक आदर्श विद्यार्थी म्हणून पाहतो. त्यांनी माझ्या कोणत्याही शब्दाला पुर्ण करण्यासाठी कधीच वेळ लावला नाही.किंबहुना माझ्या पेक्षापण दोन पाऊले पुढचा विचार करून त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या जनतेसाठी प्रदान केलेल्या सेवेमुळे या पोलीस सेनेचा सेनापती म्हणून मला आदर मिळत असला तरी त्यांचा वाटा सिंहाचा  आहे. यापेक्षा सुध्दा दररोज माझ्या आसपास वावरणारे अनेक पोलीस अधिकारी ज्यांच्यावर मागच्या काळात अन्याय झाला त्यांनी सुध्दा माझ्यासोबत काम करतांना त्या अन्यायाचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होवू दिला नाही याची जाणीव प्रमोदकुमार शेवाळे यांना आहे. काय माहित नाही हे माहित झाल्याशिवाय काय माहित आहे हे माहित होत नाही या विचाराप्रमाणे त्यांनी मागच्या दीड वर्षापासून आपल्याला काय माहित नाही यावर भर देत ज्यास्तीत जास्त शोध करून आपल्याला नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रीत केले तेंव्हा प्रसंगी एकटे राहावे लागेल तरी चालेल, परंतू संगत नेहमी सज्जनांची संगत ठेवली आणि जिल्ह्याचा कारभार ते चालवत आहेत. एक विचारवंत म्हणतो, “बदला गया सबकुछ मेरे लिये, पहले वक्त और अब यह साल भी’ या शब्दांना आठवणीत ठेवून 52 व्या वर्षात पदार्पण करत प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपले सेवे व्रत कायम ठेवले आहे.
नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर नांदेड जिल्ह्याची व्याप्ती, नांदेड जिल्ह्याचा भुभाग, नांदेड जिल्ह्यातील नेते मंडळी, नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणूस या प्रत्येकाच्या विचारांना जुळवून घेतांना आलेल्या अडचणींवर त्यांनी मात करतांना भव्य विचार हा सुगंधासारखा असतो तो पसरवावा लागत नाही आपोआप पसरतो या शब्दांवर विश्र्वास ठेवून आपल्या गंतव्य स्थानापेक्षा प्रवास जास्त सुंदर आहे. या पध्दतीने आपले मार्गक्रमण सुरू ठेवले. कोणी तरी येवून बदल घडवेल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वत:च होणाऱ्या बदलांचा भाग बनले आणि आपले मार्गक्रमण सुरू ठेवत नांदेड जिल्ह्याचा कारभार अत्यंत उत्कृष्ट पणे चालवला. विचारवंत म्हणतात. माणसाने मनात कांही ठेवून नये नसता डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या मनापेक्षा आपल्या कर्तत्वावर विश्र्वास ठेवून त्यांनी केलेले मार्गक्रमण त्यांच्या भविष्यकालीन आणि उर्वरित पोलीस सेवेत त्यांच्यासाठी एक महत्वपुर्ण मार्ग ठरेल. आपले काम करतांना त्यांनी नेहमी आपल्या शब्दांमध्ये ताकत ओतली आवाजात नाही कारण त्यांना माहित आहे फुले ही पावसाने बहरतात वादळाने नव्हे. आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये त्यांनी हे लक्षात ठेवले की,Nothing can dim the light, that shines from within प्रमाणे आपल्या स्वत:तील प्रकाश त्यांनी जागृत ठेवला आणि तो प्रकाश त्यांच्या मार्गांमध्ये प्रकाश करत राहिला ज्यामुळे चालतांना कधीच कांही अडचण त्यांना आली नाही. प्रमोदकुमार शेवाळे यांना त्यांचे स्मित हास्य सुध्दा अनेक गोष्टी सरळ करून देते. स्मित हास्य ही एक अशी वक्र रेषा आहे की, जी आपल्या आयुष्यातील अनेक वाकड्यांना सरळ करते आणि त्यामुळे आपल्या जीवनातील वळणे आपोआप संपतात.आपण खरे आहोत तर आपल्याला राग व्यक्त करण्याची गरज नाही आणि आपण चुकीचे आहोत तर राग करण्याचा आपला अधिकार नाही या शब्दांना लक्षात ठेवून प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या सहकारी अधिकारी व अंमलदारांसोबत जोडलेले संबंध त्यांच्या यशस्वी प्रवासाचे एक गमक आहे. प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या काटेरी मार्गक्रमणामध्ये वयाची 51 वर्ष पुर्ण करतांना जगाला कधीच आपल्या जखमा दाखवल्या नाहीत. कारण त्यांना माहित आहे की, आपल्या हातात मिठ घेवून लोक शेजारीच चालत असतात.
आपल्या पोलीस सेवेत मागील दीड वर्षामध्ये अनेक खतरनाक अपराध्यांना प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांनी केलेली मेहनत त्यांच्या फेट्यात गोंडा लावणारी आहे. अनेक लोकांचे संसार जुळवले, अनेक लोकांच्या साहित्याची झालेली चोरी उघड करून त्यातील बरेच ऐवज परत त्यांना दिले हे सर्व करत असतांना सामाजिक हित लक्षात ठेवतांना दोन वेगवेगळ्या विभीन्न जमातीमध्ये झालेल्या संघर्षात त्यांनी लोकांना समजून सांगितले की, तुम्ही आणि पोलीस हा वाद येथे नाही खरा वाद गुंड आणि जनता यात आहे. पोलीस त्या वादामध्ये उगीच भरडले जातात. आम्ही तुमच्या सेवेसाठीच पोलीस नोकरी पत्कारलेली आहे. हे सांगत असतांना संस्कृतीने शिकवल्याप्रमाणे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या  दु:खाची जाणिव त्यांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवली. पंडीत जवाहरलाल नेहरू सांगत होते की, इतर लोकांमध्ये आपली प्रतिमा कशी आहे यापेक्षा आपण खरे खुरे कसे आहोत हे जास्त महत्वाचे आहे आणि या शब्दाप्रमाणे आपल्या दुरडीत भाकरी नसतांना रात्रभर जागण्याची ही पोलीस नोकरी त्यांनी पत्कारली तेंव्हा आपले डोके स्थिर आणि शांत ठेवले आणि त्यांची ही कृती त्यांच्या जीवनातील प्रत्येक लढाईमध्ये ब्रम्हास्त्र ठरली. प्रसिध्द बुध्दीबळपटू विश्र्वनाथन आनंद सांगतात यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही पण स्वत:ला ओळखून, स्वत:ला, स्वत:साठी, स्वत:कडून नेमके काय हवे हे शोधले म्हणजे यशाच्या जवळ जाता येते. या पध्दतीप्रमाणे प्रमोदकुमार शेवाळे यांनी सन 1996 पासून स्विकारलेली पोलीस सेवा आजतागायत चढत्या आलेखावरच आहे. आपल्या पोलीस सेवेत वाद आणि भांडण याचा फरक अत्यंत उत्तमरित्या प्रमोदकुमार शेवाळे यांनी समजून घेतल्यामुळे त्यांचा हा प्रवास सुखकरच आहे.
प्रसिध्द कवी जावेद अख्तर म्हणतात, “जहॉं सब जाते है वहॉं जाना अच्छा नहीं लगता हमें पामान रास्तोंपर चलना अच्छा नहीं लगता’ या शब्दांप्रमाणे कधी तरी आपल्याला वागण्याची गरज आहे असे आम्ही सांगू इच्छतो ते सुध्दा विनम्रपणे कारण एक विचारवंत सांगतो की, “अदब सिखना हैं तो कलम सें सिखो, जब भी चलती है सिर झुकाकर चलती है।’हे सर्व लिहित असतांना आम्हाला सांगायचे आहे की, प्रेमासाठी घेतलेले वैर कधीच गैर नसत आणि आपल्याला तर स्वत: ऐवजी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी हे वैर स्विकारायचे आहे याला जोडण्यासाठी आम्ही सर रविंद्रनाथजी टागोर यांचे शब्द उल्लेखीत करू इच्छीतो की, जगात आपला कोणी शत्रु नाही याचा अर्थ आपण लाचार आहात. याचा अर्थ असाही नव्हे की, तुम्ही प्रत्येकाला झोडपून काढा पण आली अंगावर तर घेतली शिंगावर या म्हणीप्रमाणे कांही दिवसांच्या विश्रांतीनंतर वागत जा जेणे करून कोणाची आपल्या अंगावर येण्याची हिंमत होणार नाही. आम्ही हे सर्व लिहित असतांना आम्ही कधीच आमच्या आत्म्याचा सौदा केलेला नाही हे नक्कीच सांगायचे आहे, कधी-कधी शब्द सुध्दा मुके होतात म्हणून आम्ही आमच्या लेखणीतून त्यांना गिरवतो. आम्ही असेही सांगू इच्छीतो की, हे लिहिण्यामागे अशी आमची दुर्दम्य इच्छा आहे की, कांही लोकांनी आम्हाला दगडे मारली तेंव्हा आम्ही पाहिलेल्या सावल्या त्याच होत्या ज्यांचे अनेक गुन्हे आम्ही आमच्या डोक्यांवर घेतले होते. तेंव्हा आमच्या शब्दांना आपल्या मनात साठवा यात आम्ही उत्तमताच दाखवली आहे. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिले तरी ते खुप चांगले आहे. चांगले जीवन जगण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की, सर्वांना सर्व कांही मिळणे शक्य नसते. त्यातील आम्ही तर भिकारीच आहोत. तेंव्हा आर्शीवाद देण्याशिवाय या शब्दांमध्ये दुसरे कांही नाही.
चांगल्या माणसामध्ये एक वाईट गुण असते आणि तो गुण म्हणजे तो सर्वांनाच चांगले समजतो. एखादा व्यक्ती आंधळ्या व्यक्तीला रंगाची महत्ता समजून सांगू शकतो. तो व्यक्ती जीवनातील सर्व कांही समजून सांगू शकतो. ही आपल्यामध्ये असलेली ताकत वापरत जा. कांही कडक शब्दात आम्ही लिहिले असले तरी आपल्या कोमलतेमध्ये सुध्दा प्रचंड सामर्थ्य आहे याची जाणिव आम्हाला आहे. कारण कोमल असलेल्या पाण्याने खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावतात हे आम्ही पाहिलेले आहे. कोणताही नकाशा उपलब्ध नसतांना पाखरे आपल्या ध्येयाला गाठतातच मग आम्ही तर माणसं आहोत तेंव्हा आपले ध्येय गाठण्यासाठी आम्ही नवीन नवीन आयडीया लढवू शकतो ही कला सुध्दा आपल्यात आहे याची जाणिव आम्हालाही आहे. जीवन जगतांना सा रे ग म चे सुरू आम्हाला झिंगवत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्देवाने आपण त्याला “सारेगम’ असे समजतो आणि तेथेच आपली अडचण होते. तेंव्हा श्वास आणि विश्र्वास या दोन्ही अदृश्य बाबींमध्ये एवढी मोठी ताकत आहे की, अशक्य गोष्टींना ते शक्य बनवतात. कधी काळी आपल्या जीवनात अडचणीच वाटल्या तर विचारवंत अशा परिस्थित म्हणतो की, “चलो एक लंबी दौड लगाते है.. मंझील से पुछ के आते है की अब कितना संघर्ष बाकी है।’ असे केल्यानंतर नक्कीच आपल्या जीवनाची ताकत जास्त वाढेल आपल्याला जगणे ठाऊक आहे त्यामुळे आपण कस वागाव हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. आपल्यात कोमलता आहे म्हणजे ती आपली दुर्बलता नव्हे हे आम्ही जाणतो. पण काम करतांना, जेथे आपल्याला रोपटे रोवायचे आहे त्या जमीनीची पारख करत जा कारण प्रत्येक मातीत इमान असेलच असे नसतं. पण या पारखेत खऱ्यांना दुर करू नका हे जरूर आम्हाला मांडायचे आहे.
आपल्या जन्मदिनाचा सन्मान करतांना शब्दांच्या सिमा मर्यादीत ठेवत अर्थांना अमर्याद सिमा देत आम्ही शब्दांना कष्ट होणार नाही याची जाणिव ठेवून केलेली ही मांडणी आपल्या जीवनातील सन्मान वाढविण्यासाठी नक्कीच आपला सहयोग करेल या शब्दांसह जगासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती असाल पण एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही संपुर्ण जग असू शकता या शब्दांसह आपल्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभकामना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *