विक्की चव्हाण आणि विक्की ठाकूर या दोन मित्रांचा खून बिघानिया गॅंगने केला होता
नांदेड(प्रतिनिधी)-विक्की ठाकूरचा खून केल्याप्रकरणी बिघानीया गॅंगची मकोका कायद्याअंतर्गतली पोलीस केाठडी प्रक्रिया आता शेवटच्या टप्यात आली असून उद्या दि.25 नोव्हेंबर रोजी नितीन जगदिश बिघानीया याची पोलीस कोठडी संपणार आहे.

20 जुलै 2021 रोजी गाडीपुरा भागात विक्की दशरथसिंह ठाकूर (32) याचा खून झाला होता. या खून प्रकरणात एकूण 11 आरोपींना पकडण्यात आले होते. त्यात दोन महिला आहेत. खून प्रकरण पुढे मकोका कायद्यात बदलले त्यात कांही काही अंतराने 11 आरोपींना मकोका कायद्यातील परिस्थितीनुसार अटक झाली आणि त्यांना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली. काल दि.23 नोव्हेंबर रोजी इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी दोन महिला आणि शेवटचा 11 वा आरोपी नितीन जगदीश बिघानीया या तिघांना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती कररण्यात आली. तयात महिलांना आज दि.24 नोव्हेंबरची एक दिवसाची पोलीस कोठडी होती. ती आज संपली आणि दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवून देण्यात आले. या प्रकरणातील शेवटचा आरोपी नितीन जगदीश बिघानिया याची पोलीस कोठडी उद्या दि.25 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार विक्की ठाकूरचा खून प्रकरणानंतर मकोका कायद्यातील पोलीस कोठडीतील शेवटचा टप्पा आता संपण्याच्या मार्गावर आहे. ऑगस्ट २०२० मध्ये बिघानिया गॅंगनेच विक्की ठाकूरचा मित्र विक्की चव्हाणचा खून केला होता.बिघानिया गॅंग मधील एकाने विक्की चव्हाणच्या मित्रांविरुद्ध दिलेल्या जीवघेणा हल्ला या आशयाच्या तक्रारीतून तिन्ही मित्र आता जामिनीवर तुरुंगातून बाहेर आले आहेत.