नांदेड (प्रतिनिधी)-मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी देशभक्तीपर गितांचा अनोखा आविष्कार सैनिक हो तुमच्यासाठी…. हा कार्यक्रम यावर्षीही दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सुर नवा ध्यास नवाचे तीन मुख्य कलावंत आणि विशेष म्हणजे महिला वाद्यवृंद यात सहभागी होणार आहेत.
संवाद संस्था आणि नांदेड पोलीस दल यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन होते. यंदाचा हा कार्यक्रम ५४ वा असून, दरवर्षी वेगवेगळ्या कलावंतांना व वैशिष्ट्यपूर्ण बाबींना समोर आणत पत्रकार विजय जोशी त्याची निर्मिती करतात.
प्रख्यात गायक रविंद्र खोमणे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध कलावंत यात सहभागी होणार आहेत. यावर्षी सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात महिला विशेष पर्वात आपला ठसा उमटविणारी मालविका दिक्षित तसेच गौरव महाराष्ट्राचा व संगीत सम्राट महासंग्रामाचा महाविजेता आणि सुर नवा ध्यास नवाचा उपविजेता रविंद्र खोमणे तसेच सुर नवा ध्यास नवा मध्ये आपल्या गायनाने अख्या महाराष्ट्राला नवी ओळख देणारा पर्व ३ चा फायनालिस्ट मनव्वर अली हे हा कार्यक्रम गाजविणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला वाद्यवृंद की बोर्डवर पल्लवी घाणेकर, गिटारवर ऐश्वर्या उदावंत, कोंगो आणि साईड रिंदमवर ज्योती बोराडे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबत मुंबईहून राम हिवाळे, बासरीवर या कार्यक्रमात संगीत साथ करणार आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कार्यक्रमात गाजलेली अमर वानखेडे, जगदीश व्यवहारे, जितेंद्र साळवी, संजय हिवराळे यांचीही संगीत साथ मिळणार आहे. महाराष्ट्राचा प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार या कार्यक्रमाचे जोशपूर्ण निवेदन करणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संकल्पना नांदेडच्या सांस्कृतिक विश्वात वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमाची कलाकृती देणारे पत्रकार विजय जोशी यांची आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणाNया या कार्यक्रमास सर्वांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या नियम व अटीचे पालन करुन उपस्थित रहावे, असे आवाहन संवाद संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
२६/११……..मुंबईवरील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सैनिक हो तुमच्यासाठीचा ५४ वा प्रयोग, दिग्गज कलावंत आणि महिला वाद्यवृंद यावर्षीचे प्रमुख आकर्षण