
नांदेड (प्रतिनिधी)-बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या शेख जाकीर शेख सगीरच्या लेटरपॅडवर रामप्रसाद खंडेलवाल यांच्याविरुध्द मुंबईमध्ये महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात दिलेल्या एका ओसीवर त्या कार्यालयाचे शासकीय शिक्के मारलेले एक पत्र व्हॉटसऍप गु्रपवर सुनिल अनंतवार नावाच्या व्यक्तीने प्रसारीत करून “यावर उत्तर द्या त्यांना’ असे लिहिले आहेे. या अर्जावर स्वाक्षरी कोणाची आहे ते पान मात्र व्हायरल करण्यात आलेले नाही. हा अर्ज वाचणारा प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थाने समजुन जाईल की, कोण बोगस आहे. कोण तथाकथीत आहे. कोण आपले उखळ पांढरे करून घेणार आहे. यासाठी कांही वेगळे करण्याची गरज नाही.
नांदेडच्या वजिराबाद गुन्हा क्रमांक 397 मध्ये आरोपी असलेल्या गौतम जैन हा व्यक्ती ऍडमिन असलेला शासन प्रशासन पोलीस पत्रकार असा एक व्हॉटसऍप गु्रप आहे. 3 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला तेंव्हा यातील सर्व व्यक्तींना रिमुव्ह करून तो गु्रप गायब झाला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने गौतम जैनला गुन्हा क्रमांक 397/2021 मध्ये अंतरीम (तात्पुरता) अटकपुर्व जामीन मंजुर केला. याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. या गु्रपवर सुनिल अनंतवार नावाच्या व्यक्तीने मोबाईल क्रमांक 9763034865 या मोबाईल क्रमांकवरुन चार पानाचा एक अर्ज व्हायरल केला. या अर्जामध्ये स्वाक्षरी कोणाची आहे ते पान मात्र व्हायरल करण्यात आले नाही. हा अर्ज व्हायरल करून “यावर उत्तर द्या त्यांना’ असे लिहिले आहे.
या अर्जात वजिराबाद येथील गुन्हा क्रमांक 397, शिवाजीनगर येथील गुन्हा क्रमांक 451 आणि मनाठा येथील गुन्हा क्रमांक 150 चे तपासीक अंमलदार म्हणून पत्रकार रामप्रसाद श्रीकृष्ण खंडेलवाल या बोगस पत्रकाराला नियुक्त करावे असा विषय आहे. त्याला संदर्भ मी दि.3 नोव्हेंबर रोजी केलेली तक्रार असा आहे. पोलीसांकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखाप्रमाणे सध्या तुरूंगात असलेल्या पवन जगदीश बोरा (शर्मा) याने ती तक्रार दिलेली आहे. या अर्जाच्या पहिल्या पानावर लिहिलेले काही शब्द व्हाईटनर लावून लपवलेले आहेत.यातच सर्व कांही कळते. रामप्रसाद खंडेलवालविरुध्द गुन्हा क्रमांक 129/2015 दाखल असल्याबाबत लिहिले आहे. तसेच एक अपील प्रकरण क्रमांक 583/2020 न्याय प्रविष्ठ आहे. तसेच अबु्रनुकसानी खटला क्रमांक 28/2020 आणि 79/2021 प्रलंबित असल्याचे लिहिले आहे. यातील 58 आणि 79 क्रमांकाचे खटले बोगस माहिती अधिकार समितीच्या तथाकथीत महाराष्ट्र भूषण शेख जाकीर शेख सगीरने दाखल केलेले आहेत. याशिवाय सुध्दा जास्त माहिती घेतली असती तर रामप्रसाद खंडेलवाल विरुध्द आणखी कांही सुध्दा गुन्हे दाखल होते. शेख जाकीर शेख सगीर या व्यक्तीविरुध्द जातीय दंगल भडकविणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा उल्लेख या अर्जात नाही.
बोगस न्युज पोर्टल असे नाव लिहिले आहे पण ते त्या पोर्टलचे नाव काय? हे लिहिलेले नाही. गुन्हा क्रमांक 397 मधील आरोपी पवन बोरा बाबत सीसीटीव्ही फुटेजच्या फोटोवर आधारीत प्रकाशीत केलेल्या बातमीवर आक्षेप घेतांना त्यास महापोलीस निरिक्षकांनी सोडले असे त्या बातमीत लिहिले होते. त्यामध्ये कांही एक चुक नाही. फक्त फोटोच नव्हे तर त्या आरोपीचे अनेक सीसीटीव्ही व्हीडीओ उपलब्ध आहेत.
गुन्ह्याचा तपास कसा करावा असा दबाव रामप्रसाद खंडेलवाल पोलीसांवर आणतो असे लिहिलेले आहे. पण असा कोणताही शब्द रामप्रसाद खंडेलवाल यांनी लिहिलेल्या बातमीत नाही. कांही पोलीस अधिकाऱ्यांची पदे उल्लेखीत करून अपशब्द वापरत रामप्रसाद खंडेलवाल त्यांच्या बातम्या प्रसारीत करतो असे लिहिले आहे. रामप्रसाद खंडेलवाल यांनी लिहिलेल्या बातम्यांना समजण्यासाठी डोक लागत. याची जाणिव हा अर्ज लिहिणाऱ्याला नाही. अवैध धंदेवाल्यांशी रामप्रसाद खंडेलवालची हात मिळवणी आहे असे या अर्जात लिहिले आहे. त्याची तपासणी कोणीही करावी त्यासाठी रामप्रसाद खंडेलवाल कधी ही तयार आहे. पण बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीला रामप्रसाद खंडेलवालचीच काय तर जनतेतील कोणत्याही व्यक्तीची तपासणी करण्याचा कांही एक कायदेशीर हक्क नाही.
पोलीसांना रामप्रसाद खंडेलवालमुळे काम करणे त्रास दायक झाले आहे. असे लिहिले आहे. या संदर्भाने रामप्रसाद खंडेलवाल जाहिर करू इच्छीतो की, याबाबत पोलीसांचे मतदान घेणे गरजेचे आहे. पण असा हक्क सुध्दा या बोगस समितीला कोणी दिलेला नाही. रामप्रसाद खंडेलवाल तर असे कधी म्हणणारच नाही.
उलट हेच बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीची मंडळी स्वत:लाच क्राईम हेड समजते आणि पोलीसांना त्रास देते, जनतेला त्रास देते, शासकी य अधिकाऱ्यांना त्रास देते. याबाबत पोलीस विभागानेच जनतेला जाहीर आवाहन करून यांनी दिलेल्या त्रासासाठी तक्रार देण्यास सांगितले आहे. व्हॉटसऍप गु्रपवर प्रसारीत केलेल्या संदर्भाप्रमाणे 3 नोव्हेंबरची माझी तक्रार म्हणजे त्या तक्रारीवर तुरूंगात असलेल्या आरोपीची स्वाक्षरी आणि या अर्जात लपवलेली स्वाक्षरी एकच असेल तर कोण बोगस, कोण तथाकथीत, कोण आपले उखळ पांढरे करतो ह्यावर वेगळे लिहिण्याची गरज नाही.