नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या दुचाकी वाहनांमधील 23 वाहने दि.30 नोव्हेंबर रोजी स्क्रॅप पध्दतीने विक्री केली जाणार आहेत. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वाहने पाहुन खरेदी करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहावे.
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात बेवारस आणि लावारीस अशा स्थितीत 23 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबाबत या दुचाकी गाड्यांच्या मालकाचां शोध घेतला पण मालक सापडले नाहीत. तरी या वाहनांचा लिलाव, स्क्रॅप पध्दतीनुसार करण्याचे आदेश तहसीलदार नांदेड यांनी जारी केले आहेत. त्यानुसार दि.30 नोव्हेंबर रोजी, मंगळवारी सकाळी 11 वाजेच्यासुमारास ही लिलाव प्रक्रिया वजिराबाद पोलीस ठाण्यात पार पाडली जाणार आहे. तरी जनतेने या दिवशी उपस्थित राहून, वाहनांचे निरिक्षण करून, ही स्क्रॅप वाहने खरेदी करावी असे आवाहन वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.
30 नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात 23 दुचाकी वाहनांचा होणार लिलाव