नांदेड(प्रतिनिधी)-नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी मध्यप्रदेशातून पकडून आणलेल्या एकासह नांदेडमधील तीन अशा चौघांची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.
एनसीबी पथक विभागीय कार्यालय मुंबई यांनी नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण चौकात धाड टाकून एका व्यापारी संकुलातून 111 किलो अफुबोंढे पावडरसह पकडले. सोबतच 1 किलो पेक्षा जास्त अफीम पकडले. याप्रकरणी एनसीबी पथकाने हरदयालसिंघ गुलाबसिंघ कटोदीया, जितेंद्रसिंघ परगनसिंघ भुल्लर, जीवनसिंघ अवतारसिंघ चोपरा या तिघांना ताब्यात घेतले. 23 ते 26 नोव्हेंबर हे तिघे विमानतळ पोलीसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने एनसीबीला दिले होते. आज पोलीस कोठडी संपली तेंव्हा सद्दाम अजमेरी मुबारीक अजमेरी रा.मंदसौर (मध्यप्रदेश) या व्यक्तीला एनसीबी पथकाने न्यायालयात हजर करून त्याचे चौकशी करण्यासाठी 9 डिसेंबर 2021 पर्यंतची वेळ मागितली. त्यानुसार चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सदाम अजमेरी मुबारक अजमेरीला सध्या तुरूंगात पाठवले आहे. सदाम अजमेरीला 23 नोव्हेंबर रोजी एनसीबी मंदसौर मध्यप्रदेश कार्यालयाने अटक केलेली आहे.
या प्रकरणातील इतर तिघांना सुध्दा न्यायालयीन कोठडीत पाठवावे अशी विनंती एनसीबी पथकाने केली आहे त्यांची सुध्दा रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. यामुळे सदाम अजमेरीकडून नांदेड येथे पकडलेले अफु बोंडे, पावडर आणि अफीम या संदर्भाने पुन्हा एकदा चौकशी होणार आहे असे दिसते.
एनसीबीने मध्यप्रदेशातुन पकडलेल्या आरोपीच्या चौकशीसाठी 9 डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली ; न्यायालयाने सध्या चौघांना तुरूंगात पाठविले