कृष्णा गोरेकरचा खून करणारा अमोल बुक्तरे तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-गोविंदनगर नाल्याजवळ आपल्याच वस्तीतील एका युवकाचा खून करणाऱ्या युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
निलाबाई भगवान गोरेकर (55) रा.गोविंदनगर नाल्याजवळ नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझा मुलगा कृष्णा भगवान गोरेकर (21) हा ज्या फायनान्समध्ये काम करतो त्या राजू महाराजचा जन्मदिन पाच ते सहा महिन्याअगोदर होता. त्या ठिकाणी अमोल नारायण बुक्तरे (24) याचे आणि माझा मुलगा कृष्णाचे भांडण झाले होते. त्यावेळेस आम्ही कांही तक्रार दिली नव्हती. दि.24 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 10.30 वाजेदरम्यान हा प्रकार घडला. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 357 /2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल केला आहे. पोलीसंानी त्वरीत हालचाल करून कृष्णाचा खून करणाऱ्या अमोल नारायण बुक्तरेला ताब्यात घेतले होते.
आज दि.26 नोव्हेंबर रोजी तपासीक अंमलदार सहायक पोलीस निरिक्षक एन.आर.अनलदास आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार गुट्टे आणि रामदास सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी पोलीसांसह अमोल बुक्तरेला न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडीची विनंती करून अमोलला पोलीस कोठडी मंजुर करावी असे सांगितले. सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी पोलीस कोठडी का आवश्यक आहे याचे सादरीकरण न्यायालयासमक्ष केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी अमोल बुक्तरेला तीन दिवस अर्थात 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *