नांदेड(प्रतिनिधी)-बोलण्याची सुरूवात दादा या शब्दापासून करून दोन चोरट्यांनी एका युवकाच्या हातातील मोबाईल आणि पैशांचे पॉकिट घेवून पळ काढण्याचा प्रकार नवीन मोंढा येथील एसबीआय बॅंकेसमोर घडला. एका मोबाईल कंपनीचे टॉवर केबल चोरीला गेले आहेत.
हनमंत नागनाथ देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते 3.22 या वेळेदरम्यान एसबीआय बॅंक नवीन मोंढा येथे एटीएममधून पैसे काढत असतांना दोन अनोळखी व्यक्ती 22 ते 25 वयोगटातील त्यांच्याकडे आले. त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता. दादा आमच्या घरी आम्हाला पैसे पाठवायचे आहेत. तुमच्या फोन पे वरून पाठवा आम्ही तुम्हाला रोख पैसे देतो असे सांगितले आणि हनमंत देशमुखच्या हातातील फोन घेवून बॅंक खात्याची माहिती घेतो म्हणून फोन पन घेतला त्यावेळी बॅंक खाते क्रमांक आपल्या हातावर लिहित असतांना हनमंत देशमुखने आपल्या पैशांचे पाकिट दुसऱ्या माणसाकडे दिले. नंबर लिहिण्याच्या काळातच त्या दोघांनी पॉकिट आणि फोन घेवून तेथून पळ काढला. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार शेख इब्राहिम करीत आहेत.
लघळूद शिवारात असलेल्या एका मोबाईल टॉवरमधील दहा हजार रुपये किंमतीचे कॅंबेल 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चोरीला गेले आहे. याबाबतची तक्रार मधुकर रमेश गायकवाड यांनी भोकर पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस अंमलदार कदम करीत आहेत.
दादा अशा शब्दात गोडबोलत चोरट्यांनी एका युवकाचा मोबाईल व पॉकिट पळवले