नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचावर जिवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे. तसेच एका 19 वर्षीय युवकाला आणि त्याच्या वडीलांना कारण नसतांना जिवे मारण्याचा प्रयत्न सावरगाव कला ता.उमरी येथे घडला आहे.
एका 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला पकडून बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक इंद्राळे अधिक तपास करीत आहेत.
संतोष सुरेश जोगदंड यंानी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता ते आणि त्यांचे वडील शेताकडे जात असतांना कांही जणांनी कुठलेही कारण नसतांना लाकडी पालव्याने व लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला अणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुलगिर अधिक तपास करीत आहेत.
एका विवाहितेवर जिवघेणा हल्ला; वडील आणि पुत्राला जीवे मारण्याचा प्रयत्न