नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषीपंप ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला द्यावयाचे अर्थ सहाय्य24 नोव्हेंबर रोजी 2927.74 कोटी रुपये वीज वितरण कंपनीकडे समायोजित केले आहे.या शासन निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे अवर सचिव नानासाहेब ढाणे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीकडून वीज दरात सवलत देण्यात येते आणि त्याची प्रतिपुर्ती महाराष्ट्र शासन करत असते. सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी राज्य शासनाने ही प्रतिपुर्ती करता यावी म्हणून 5300 कोटी रुपयांची तरतुद केलेली आहे. त्यातील 361 कोटी रुपये जून 2021 मध्ये वीज वितरण कंपनीला दिलेले आहेत. आता उर्वरीत रक्कमेपैकी 2927.74 कोटी रक्कम वित्त विभागाच्या मंजुरीनंतर देण्यात आली आहे.ही रक्कम महावितरण कंपनीस रोख न देता शासनास महावितरण कंपनीकडून येणे असलेल्या रक्कमेपोटी वसुल करण्यात आली आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 202111241759142410 नुसार प्रसिध्द करण्यात आला आहे.
राज्य शासनाने वीज वितरण कंपनीला देणे नाही घेणे नाही या तत्वावर 2927.74 कोटी रुपये समायोजित केले