विविध विषयांवरून सोमवारची जि.प.सर्वसाधारण सभा गाजली 

नांदेड(प्रतिनिधी)-सदस्यांच्या प्रलंबित कामांना अधिकारी वर्गाकडून प्रतिसाद न मिळणे, माळेगावची यात्रा, निधीचे वाटप,रोजगार हमीच्या कामासंदर्भात अनियमितता, नियमबाह्य पदोन्नती आदी विषयावर आजची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात नांदेड जि.प.ची या सत्रातील कदाचित शेवटची ही सर्वसाधारण सभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा  ठाकूर तसेच विविध विषयांचे सभापती व अधिकारी उपस्थित होते. या सभेला केवळ 19 सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत 11 महिन्यासाठी नियमबाह्य पदोन्नती देऊन आतापर्यंत पदोन्नतीचे लाभ देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यातील काही लोक पदोन्नतीच्या वेतनासह सेवानिवृत्त झाले आहेत. याची जाबाबदारी कोणाची असा प्रश्न प्रशासनाला विचारला होता. या प्रकरणी सोमवारी दि.29 रोजी जि.प. सर्वसाधारण सभेत जि.प.सदस्य ऍड.विजय धोंडगे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांनी एका आठवड्यात कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागात तत्कालीन शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे व संदीप सोनटक्के यांनी नियमाची पायमल्ली करुन 14 कर्मचायांना पदोन्नती दिली होती. त्यानंतर या 14 कर्मचायांना अभावितपणे  महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदावनत करण्यात आले नाही. तसेच त्यांनी या पदोन्नती पदाचा पुर्ण लाभ घेतला. यात नवीन येणाया शिक्षणाधिकायांनी या संचिकावरची धुळ झटकली नाही, किंबहुना लालसेपोटी अधिकाऱ्यांना पदावनत केले नाही, अशी चर्चा जि.प.परिसरात होती. हा मलिदा कोणी लाटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जि.प.च्या सर्वसाधारण बैठकीत जि.प.सदस्य ऍड.विजय धोंडगे यांनी हा प्रश्न उपस्थित करुन सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांनी एका आठवड्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
दरम्यान जि.प. मधील असे किती (?) कर्मचारी नियमबाह्य पदोन्नतीवर आहेत, याची माहिती समोर यावी, अशी अपेक्षा जि.प. कर्मचायांनी व्यक्त केली आहे. याच सभेत जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश देशमुख भोसीकर यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाया कामात कुचराई केल्याचा आरोप करत काही तरी पुण्याचे कामे करा, असा सल्ला देत अध्यक्षांना घरचा आहेर केला. जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी पदाधिकारी व प्रशासनास ज्ञानाचे डोस पाजत सर्व सदस्यांना समान न्याय देण्याची मागणी करतांना सभागृह स्तब्ध झाल्याचे पहावयास मिळाले. माळेगावची यात्रा यावर्षी होणार की नाही या विषयावर मोघम उत्तर मिळाले. कोरोनाचे नवे संकट लक्षात घेता प्रशासनाशी चर्चा करुन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. या सभेत सदस्य माणिक लोहगावे, पुनम पवार, चंद्रसेन पाटील, दशरथ लोहबंदे, साहेबराव धनगे, मनोहर शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी अनेक विषय लावून धरल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *