पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे शेख जाकीर एसीबी नावाचा कोणी व्यक्ती असल्याचे पोलीस उपनिरिक्षकाला माहित नाही ;न्यायालयात दिलेल्या साक्षीतून समोर आलेले तथ्य
नांदेड(प्रतिनिधी)-एका नियमित खटल्यात बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीच्या तथाकथीत संस्थापक अध्यक्षाने दिलेल्या जबाबानंतर उपलब्ध पुरावा आधारे या प्रकरणातील तपासीक अंमलदाराने दिलेल्या न्यायालयातील साक्षीनुसार शेख जाकीर (एसीबी) नावाचा व्यक्ती पोलीस होता की नाही याची मला माहिती नाही अशी साक्ष दिली आहे. साक्ष देणारे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे सध्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत.
पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे हे सन 2017-2018 मध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पोलीस उपनिरिक्षक पदावर काम करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे गुन्हा क्रमांक 28/2018 हा तपासासाठी देण्यात आला होता. तो गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ, 323 प्रमाणे दाखल होता. या गुन्ह्याचे रुपांतर पुढे खटला क्रमांक 260/2018 असे झाले. या गुन्ह्यातील वैद्यकीय अहवालामध्ये त्याप्रकरणातील जखमीला दवाखान्यात आणणाऱ्या माणसाचे नाव शेख जाकीर एसीबी असे लिहिलेले आहे. शेख जाकीरने या प्रकरणात साक्ष देतांना माहिती अधिकार संरक्षण समिती अस्तित्वात नाही असे सांगितलेले होते.
या प्रकरणात आपला जबाब देतांना स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी या सर्व प्रकरणाची माहिती आपल्या जबाबानुसार साक्षीदार क्रमांक 5 म्हणून नोंदवली. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एसीबीची कोणतीही शाखा नाही हे सांगितले तसेच पोलीस ठाण्यात आलेला कोणताही जखमी एसबीमार्फत पाठवला जात नाही. माझ्या तपासादरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे शेख जाकीर एसीबी नावाचा व्यक्ती कर्तव्यावर होता किंवा कसे या बाबत मला माहित नाही. त्या व्यक्तीबाबत मी माहिती दाखल करू शकत नाही. दत्तात्रय काळे यांनी यावेळे पुन्हा सांगितले की, पोलीस स्टेशनमधुन माहिती घेवून मी दाखल करू शकतो. पोलीस स्टेशनमधून जखमीला उपचारासाठी पाठवले जाते तेंव्हा त्यावर पोलीस स्टेशनचे नाव लिहिलेले असते या वाक्याला खरे आहे असे उत्तर दिले. नांदेड जिल्ह्यात एसीबी नावाचे कोणतेही पोलीस स्टेशन अस्तित्वात नाही असे दत्तात्रय काळे यारंनही सांगितले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अर्थात जखमीला दवाखान्यात नेले तेंव्हा दवाखान्यातील नोंदी प्रमाणे त्यावर जखमीला दवाखान्यात आणणाऱ्याचे नाव शेख जाकीर एसीबी असे लिहिलेले आहे.