नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या देगलूर नाका परिसरात आज 9 दुकानांना पहाटे उजेड होण्यापुर्वी लागलेली आग अग्नीशमन पथकाच्या 2 बंबांनी अटोक्यात आणली.
आज दि.1 डिसेंबर रोजीची पहाट होण्याअगोदर तीन वाजेच्यासुमारास देगलूर नाका चौरस्त्यावर असलेल्या सलग 9 दुकानांना आगीने वेडा घातला. त्यामध्ये महंम्मद उमर यांचे पान दुकान, वाजीद अजीज यांचे फळांचे दुकान, अब्दुल मुख्तार अब्दुल सत्तार यांचे खुबा हॉटेल, शेख बाबु चिकनवाला यांचे चिकनचे दुकान, अब्दुल हबीब चौधरी यांचे फुलांचे दुकान, मोसीन खान यांचे मोबाईल दुकान, शेख मुकीम यांचे पान शॉप, मोहम्मद हुसेन यांचे अल्फा हॉटेल यांना आगीने वेडा घातला. ही दुकाने एक-दुसऱ्या लगत आहेत. एका दुकानात लागलेल्या आगीने 9 दुकानांना आपल्या कवेत घेतले.
अग्नीशमन अधिकारी रईस पाशा आणि त्यांचे जवान दोन आग विझवणाऱ्या बंबांसह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आग आटोक्यात आली. या अग्नीच्या तांडवात जीवहाणी मात्र झाली नाही. नुकसान मात्र सर्वांचेच झाले आहे.
देगलूर नाका परिसरात आगीच्या तांडवात नऊ दुकाने जळाली