माजी पोलीस उप अधीक्षक श्री लालसिंहजी रामजीतसिंहजी पालीवाल यांचे निधन

डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांना पितृशोक 
सकाळी १० वाजता गोवर्धन घाट येथे होणार अंतिम संस्कार 
नांदेड,(प्रतिनिधी)- सेवा निवृत्त पोलीस उप अधीक्षक श्री लालसिंहजी  रामजीतसिंहजी पालीवाल यांचे निधन झाले आहे.आज सकाळी १० वाजता त्यांच्यावर शांतीधाम,गोवर्धन घाट येथे अंतिम संस्कार होणार आहेत.श्री लालसिंहजी पालीवाल हे यशोसाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांचे वडील आहेत.
                          नांदेड जिल्ह्यासह राज्यात आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटवणारे श्री लालसिंहजी  रामजीतसिंहजी पालीवाल (८५) यांनी पोलीस उप निरीक्षक पदापासून आपल्या सेवेची सुरुवात केली.पदोन्नती प्राप्त करीत त्यांनी आपली सेवा पोलीस उप अधीक्षक पदा पर्यंत मजल मारली होती.अत्यंत दबंग अशी त्यांची ख्याती होती.नांदेड जिल्ह्यात तर काहीही समस्या आली तर श्री लालसिंहजी  रामजीतसिंहजी पालीवाल यांनाच बोलावले जायचे.नांदेड शहरातील शिवाजीनगर,वजिराबाद,इतवारा आदी पोलीस ठाणी त्यांनी सांभाळली होती.देगलूर येथे त्यांनी केलेले कार्य प्रशंसनीय होते.
                         वयाच्या ८५ व्या वर्षी श्री लालसिंहजी  रामजीतसिंहजी पालीवाल यांनी जगाचा निरोप घेतला आहे.आज सकाळी १० वाजता शांतीधाम,गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलचे संचालक  डॉ.देवेंद्रसिंह   पालीवाल यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *