नांदेड(प्रतिनिधी)-2 डिसेंबर रोजी सकाळी एका 75 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या अंगावरील दागिणे चोरण्यासाठी हा खून झाल्याची चर्चा सुरू आहे.
रामतिर्थ येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या वसाहतीमध्ये राहणारी अनवर बी मैनोद्दीन शेख (75) या मागील अनेक वर्षापासून मोलमजुरी करतात आणि कारखान्याच्या वसाहतीमध्येच राहतात. आज 2 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यूदेह सापडला तेंव्हा कोणी तरी मारेकऱ्याने त्यांच्या अंगावरील त्यांचीच ओढणी घेवून त्यांचे तोंड बांधून लाकडाने मारहाण केल्याचे दिसले. या मयत महिलेच्या पायातील, हातातील दागिणे, अंगठ्या, मनीमंगळसुत्र चोरुन नेण्याच्या उद्देशाने हा खून झाल्याची चर्चा सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या शेजारी 75 वर्षीय महिलेचा खून