पुरसिस दिल्यामुळे खटला निकाली निघाला; विष्णुपूरीकर कुटूंबियांच्या अब्रु नुकसानीला कोण जबाबदार
नांदेड (साभार दै.नांदेड एकजुट)- मी राज्याचा पत्रकार महर्षी असल्याचे बनावटपण दाखवणाऱ्या काही शब्द गुंडांच्या सोबत तयार झालेल्या विश्र्वास गुंडावार याने वयाने ज्येष्ठ असलेले आणि एका वर्तमान पत्राचे संपादक असलेले विष्णुपूरीकर यांच्याविरुध्द आणि त्यांच्या पत्नीविरुध्द अत्यंत चुकीचे आरोप करून दाखल केलेल्या खटल्यात विश्र्वास गुंडावारला सात वर्षानंतर दिवा स्वप्न पडले आणि त्याने आपली तक्रार बिनशर्त मागे घेतल्याची पुरसीस दाखल केली आणि विष्णुपूरीकर कुटूंबियांची त्या खटल्यातून आता सुटका झाली आहे. आता विष्णुपूरीकर कुटूंबिय विश्र्वास विजेंद्र गुंडावार विरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार आहेत.
बनावट टि.सी. व बनावट गुणपत्रीका शासनास सादर करुन पुर्ण वेळ पत्रकारानाच माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडुन दिल्या जाणारी अधिस्किृती पत्रीका घेवुन अनेक ठिकाणी त्या सवलती व फायदा घेवुन फसवणुक केल्याचा भांडाफोड दै. नांदेड एकजुट या वृत्तपत्राने 12 ऑगस्ट 2012 च्या वृत्तपत्रातुन होताच शासन व पुर्णवेळ पत्रकार म्हणुन व अर्जातील कागदपत्र सर्व बरोबर असल्याचे प्रमाणपत्र देवुन शिफारस करणारे प्रस्तापितांना घाम फुटला. शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी भादवी 420 च्या गुन्ह्यात अडकलेला सिझनेबल पत्रकार विश्वास विजेंद्र गुंडावार यांनी वरील भांडाफोड बातमीचा आकस व राग मनात धरुन आपण काम करीत असलेल्या दैनिकाच्या लाखो रुपयाच्या जाहिराती अधिकाऱ्यांशी संगनमत करुन दै. नांदेड एकजुट या वृत्तपत्रात वळविलात व दै. नांदेड एकजुट हे वृत्तपत्र फसवे पेपर असल्याचा जावाई शोध लावत 18 एप्रिल 2013 रोजी मा. मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब नांदेड यांच्या न्यायालयात किरकोळ फौजदारी आरसीसी 512, 015 नुसार विश्वास गुंडावार यांनी तक्रार दाखल केली होती.
तब्बल 7 वर्ष चाललेल्या या खटल्यात फिर्यादी विश्वास गुंडावार यांनी आपल्याकडे संबंधीत तक्रारी बाबत कुठलेही पुरावे नसुन सदरील तक्रार आपण बिनशर्त मागे घेत असल्याची पुरसीस दिली. न्यायालयाचा 7 वर्ष अमूल्य वेळ घेत 7 वर्षानंतर विश्वास गुंडावार यास कसा साक्षात्कार झाला हे देव जाणे.
सन 2003 पासुन आपण नांदेड येथील सर्वाधिक खपाच्या विभागीय दैनिकात पुर्णवेळ पत्रकार म्हणुन काम करीत असुन शासन दरबारी शपथपत्र करुन सांगणारा विश्वास विजेंद्र गुंडावार मुळात पत्रकारच नाही. सन 1998 ते 2006 पर्यंत व्यंकटेश्वरा मेडीकल जनरल स्टोअर्स, बाबा नगर, नांदेड या दुकानचा प्रोप्राईटर. दुकानात मालाची खरेदी न करताच जि.प. नांदेडच्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांची बोगस बिल व त्यावर कर्मचाऱ्यांच्या बनावट सह्या करुन दिशाभुल केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी जि.प. नांदेड यांच्या लेखी तक्रारीवरुन मा. सहाय्यक आयुक्त, औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी चौकशी करुन संबंधीत दुकानाला भेट दिली असता दुकानात मालच नसतेवेळी टक्केवारीवर बिले दिली जात होती. संबंधीताची चौकशी करुन या दुकानाचे दोन्ही परवाने कायम स्वरुपी रद्द करुन तक्रार दाखल केली होती. तर लाखो रुपयांची रोकड कॅश (खासगी सावकरी) करीत संबंधीत गरजुंना दिलेली रक्कम लवकर परत न आल्यामुळे सदरील केस न्यायालयात सन 2011 मध्ये तडजोड होवुन सुटली. यात विश्वास विजेंद्र गुंडावार यांनी आपली ओळख शपथेवर व्यापारी म्हणुन करुन दिली तर 2010 ते 2018 पर्यंत शहरातील एका ज्येष्ठ विधीज्ञाच्या कार्यालयात कर्मचारी म्हणुन कागदोपत्री ओळख असुन त्यांच्या न्यायालयीन निकालाच्या बातम्या, त्यांचे व त्यांच्या परिवाराच्या वाढदिवसाच्या जाहिराती स्थानीक व विभागीय वृत्तपत्रातुन कर्मचारी म्हणून आपल्या नावाने प्रकाशित करीत असत व उरलेल्या वेळात कधी-मधी अधिकाऱ्यांच्या बातम्या घेवुन त्यांना खुश करने एवढीच पत्रकारीता. असे असतेवेळी वृत्तपत्र सृष्टीतील पत्रमहर्षी समजल्या जाणारे प्रस्तापीतांनी मानसपुत्राला पत्रकार नसतेवेळी पुर्णवेळ पत्रकार असल्याची खोटी व चुकीची दिशाभुल करणारी माहिती व राज्यअधिस्विकृती समिती पदाचा गैरवापर करीत त्यांना शिफारस का करण्यात आली. याचा लवकरच भांडाफोड होणार आहे. वास्तविक पाहता ही जर खोटी शिफारस केली नसती हा प्रकार घडला नसता असे जाणकाराचे मत आहे. तो मी नव्हेच मधील लोखोबाच्या पात्राला देखील लाजवेल असे पात्र विश्वास गुंडावार यांनी वेळोवेळी सादर केलेले आहे. असे असतेवेळी देखील विश्वास विजेंद्र गुंडावार हा आपण पुर्णवेळ पत्रकार असल्याचे सांगतो. धन्य ते पत्रकार व धन्य ते प्रस्तापीत.
वृत्तपत्र फसवे असेल तर प्रेस ऍक्ट 1867/9 नुसार संबंधीत तक्रार ही जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी तथा मा. जिल्हा दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करता येतात. त्यांनी संबंधीत अपिल फेटाळले अथवा निकाल विरोधात दिला तर उच्च न्यायालयात दाद मागता येते जिल्हा न्यायालयात नाही असे प्रस्तापितांना माहित असतांना देखील ही तक्रार हेतुपुरस्पर, जाणिवपुर्वक, आकसबुध्दितुन विष्णुपूरीकर दांम्पत्य व दै. नांदेड एकजुट संदर्भात जिल्हा न्यायालयात दाखल करुन अडचनित आणण्यासाठी ही जाणीवुपर्वक तक्रार केली होती असे वाटते. तब्बल 7 वर्ष चाललेल्या या खटल्यात चौकशीत वजिराबाद पोलिस स्टेशन यांनी दाखल केलेल्या अहवालात सदरील वृत्तपत्र हे फसवे नसुन मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या कार्यालयातुन प्रतिज्ञापत्र करुन चालविलेले आहे. त्यामुळे हे वृत्तपत्र फसवे आहे असे म्हणता येणार नाही. विश्वास विजेंद्र गुंडावार याच्यावर बनावट टि.सी. व बनावट गुणपत्रिका या केसमधुन सुटण्यासाठी त्याने जाणिवपुर्वक खोटी तक्रार केली असुन संबंधीताकडुन विष्णुपूरीकर दांम्पत्यास जिवास धोका असल्याचा अहवाल तत्कालीन पि.एस.आय. श्री मगरे साहेब यांनी मा. मुख्यदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात दाखल केला होता. तोच निर्णय कायम ठेवत मा. जिल्हा न्यायालयाने अपिल फेटाळल्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या विश्वास विजेंद्र गुंडावार यांनी आपल्याकडे कुठलेही पुरावे नसुन सदरील तक्रार ही बिनशर्त मागे घेत असल्याची तब्बल 7 वर्षानंतर पुरसीस दिल्यावरुन मा. न्यायालयाने सदरील फिर्याद निकाली काढली. गुंडावार यांनी दाखल केलेल्या तक्रारी अर्जात वापरलेली भाषा ही अत्यंत खालच्या स्तराची होती पण प्रस्तापिताच्या तालमित वाढलेल्या पत्रकाराच्या संस्काराबद्दल न बोलणे ठिक.
संपादक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द खटला दाखल करून सात वर्षानंतर पत्रकार विश्र्वास गुंडावारला दिवा स्वप्न