नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत कार्यालय घुंगराळा येथील ग्रामसेवक आणि एक खाजगी इसम यांनी दोन भुखंडांची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 28 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीनंतर 25 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नायगाव येथे दोघांना जेरबंद केले आहे.
एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात 2 डिसेंबर रोजी तक्रार दिली की, त्यांच्या दोन भुखंडांची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी ग्रामसेवक म्हैसाजी आनंदराव कदम हे 28 हजार रुपयांची लाच मागत आहेत. या लाच मागणीची पडताळणी 3 डिसेंबर रोजी झाली. त्यात लाच मागणीच्या पैशात तडजोड सुध्दा झाली. तडजोडीनंतर 25 हजार रुपयांची लाच ग्रामसेवक म्हैसाजी आनंदराव कदम यांनी खाजगी इसम विठ्ठल देविदास माने यांच्यावतीने स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामसेवक म्हैसाजी आनंदराव कदम (39), ग्राम पंचायत कार्यालय घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड मुळ रा.पिंपळगाव ता.नायगाव आणि खाजगी इसम विठ्ठल देविदास माने (32)फुल विक्रेता रा.पिंपळगाव ता.नायगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहितपर्यंत या संदर्भाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच मागणाऱ्यास पकडण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस उपअधिक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक दत्ता केंद्रे, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हणमंत बोरकर ईश्र्वर जाधव, शेख मुजीब यांनी पुर्ण केली.
लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाने आजची माहिती देताना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल, ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 आणि पोलीस उपअधिक्षक धरमसिंग चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक 9923417076 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.