नांदेड,(प्रतिनिधी)-नेपाळ (काठमाडू) येथे पार पडलेल्या 6 व्या हापकिडो बॉक्सींग साऊथ एशियन स्पर्धेत नांदेड येथील कु.वैष्णवी चिंतोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
या स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, भुतान, बांग्लादेश या देशांचा सहभाग होता. यामध्ये कु.वैष्णवी चिंतोरे हिने द्वितीय क्रमांक पटकावले. या यशाबद्दल आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, मृणालताई राजूरकर, असोसिएशनचे सचिव राज वागदकर सर, जुगलकिशोर धुत, नांदेड जिल्हाध्यक्ष शेखर भावसार सर व प्रशिक्षक सौ.रंजना आढाव, बिलोली येथील के.जी.बी.व्ही. मुख्याध्यापक सावळे मॅडम, कार्यकारी अध्यक्ष रामा रोकडे यांनी हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वैष्णवी चिंतोरे हिने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक चंद्रकांत आढाव सर व परिवारांना दिले आहे.
हापकिडो बॉक्सींग साऊथ एशियन स्पर्धेत नांदेडच्या कु.वैष्णवी चिंतोरेचा द्वितीय क्रमांक