लोहा (प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील कलंबर चे भूमीपुत्र असलेले तरुण तडफदार धडाडीचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे एकनिष्ठ प्रमाणिक कार्यकर्ते असलेले विलास पाटील घोरबांड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
विलास पाटील घोरबांड यांनी २०१४ मध्ये कंधार येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करुन आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तन मन धनाने चालू आहे . विलास पाटील घोरबांड यांनी युवकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत ते गोरगरीब शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेऊन माननीय शरद पवार साहेबांचे विचार त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश मानून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक आंदोलनात, मेळाव्यात आदी कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे शेतकऱ्यांचे युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी ते सदा अग्रेसर आहेत त्यांच्या मागे युवकांची मोठी फळी आहे. ते निर्भिड निडर कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्य लोहा , कंधार, तालुक्यातसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी एखाद्या आमदार,खासदार यांच्या मुलांना करण्याऐवजी मेहबूब शेख ला केले आहे.
त्याचं धर्तीवर सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते विलास पाटील घोरबांड यांनी नुकतीच नांदेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखत दिली आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने विलास पाटील घोरबांड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करुन काम करण्याची संधी द्यावी ते त्या संधीचे सोने नक्कीच करतील अशी अपेक्षा सर्व स्तरातून होत आहे.
जिल्हाध्यक्षपदी विलास पाटील घोरबांड यांची वर्णी लावल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसला उभारी येईल