मंगळवारची कोरोना बातमी; एक नवीन रुग्ण;दोघांची सुट्टी

नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने एक नवीन रुग्ण दिला. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १९ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७. ०४ अशी आहे.
          प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ७ डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज एक कोरोना रुग्ण सापडला आहे.
खाजगी रुग्णालय-०१ आणि नांदेड मनपा हद्दीतील गृह विलगीकरांतून-०१, अश्या ०२ रुग्णाना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८२६ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज १२६५ अहवालांमध्ये १२५८ निगेटिव्ह  आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४९९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०० आणि ०१ अँटीजेन तपासणीत असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे १९ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१६,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०२, खाजगी रुग्णालयात-०१ ,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *